तैपेई : स्फोटापाठोपाठ वॉटर पार्कमध्ये भडकलेल्या भीषण आगीत २०० जण जखमी झाले असून, यापैकी ८० जण गंभीर आहेत. तैपेई शहराबाहेरील फॉर्मोसा फन कोस्ट वॉटर पार्कमध्ये शनिवारी ही दुर्घटना घडली. या वॉटर पार्कमध्ये आयोजित नृत्य-संगीतोत्सवात एक हजार लोक सहभागी झाले होते. ते एकमेकांवर रंगीत भुकटी फवारत असताना स्टेजच्या डाव्या बाजूने आग भडकताच लोकांत धावपळ सुरूझाली.
तैवानमधील आगीत २०० जखमी
By admin | Updated: June 28, 2015 03:15 IST