दुबई : जम्मू आणि काश्मीरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी येथील भारतीय विद्यार्थ्याने दोन लाख रुपये गोळा केले आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकताच अभूतपूर्व असा पूर आल्यामुळे ३०० पेक्षा जास्त लोक मरण पावले तर कित्येक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. भारतीय विद्या भवनमध्ये ११ वीत शिकणारा डी. आर. प्रत्युश्य या विद्यार्थ्याने पुढाकार घेऊन लोकांकडून १००१.२५० कुवेती दिनार्स (२,१२,४८९ रुपये) जमविले. हे पैसे त्याने पंतप्रधानांच्या राष्ट्रीय सहायता निधीला दिले आहेत.
पूरग्रस्तांसाठी विद्यार्थ्याने जमविले २ लाख रुपये
By admin | Updated: September 24, 2014 03:52 IST