शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

१८ वर्षीय टिकटॉक स्टारने केली आत्महत्या, अखेरच्या व्हिडीओमध्ये म्हणाली, मी तुम्हाला… 

By बाळकृष्ण परब | Updated: February 12, 2021 13:30 IST

Tiktak star committed suicide : डेझरिया ही टिकटॉकवर Dee या नावाने प्रसिद्ध होती. आत्महत्या करण्यापूर्वी डेझियाने एक व्हिडीओ शेअर केला होता.

वॉशिंग्टन - लहान वयात प्रसिद्धिच्या झोतात आलेली अमेरिकन टिकटॉक स्टार डेझरिया क्विंट नोएस हिने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ती १८ वर्षांची होती. डेझरिया ही टिकटॉकवर Dee या नावाने प्रसिद्ध होती. आत्महत्या करण्यापूर्वी डेझियाने एक व्हिडीओ शेअर केला होता. ही तिची अखेरची पोस्ट असल्याचे सांगण्यात येत आहे.

या व्हिडीओच्या कॅप्शनखाली लिहिले की, ओके, मला माहिती आहे की, मी तुम्हाला खूप इरिटेट करत आहे. मात्र आता ही माझी अखेरची पोस्ट आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार डेझरियाच्या पालकांनी तिच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, डेझरियाने आत्महत्या केली आहे.

मुलीच्या मृत्यूमुळे डेझरियाच्या पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. GoFundMe नावाच्या पेजवर डेझरियाच्या वडलांनी लिहिले की, ८ फेब्रुवारी रोजी माझी मुलगी आम्हाला सोडून गेली. ती माझी मैत्रिण होती. मी माझ्या मुलीचा दफनविधी करण्यासाठी कशाही प्रकारे तयार नव्हतो. ती खूप आनंदी होती. जेव्हा मी घरी यायचो तेव्हा मला रस्त्यावर पाहून ती खूश व्हायची. मला एवढेच वाटते की तिने ताणतणाव आणि आत्महत्येच्या विचारांबाबत माझ्यासोबत बोललं पाहिजे होतं. आपण त्यावर काही तोडगा काढला असता. आता जेव्हा मी घरी येतो, तेव्हा माझी वाट पाहण्यासाठी कुणी नसते.

डेझरिया सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होती. टिकटॉकवरही तिचा मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग होता. ती इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरही खूप लोकप्रिय होती. इन्स्टाग्रामवर तिने Bxbygirlldee नावाने अकाऊंट उघडले होते. डेझरियाच्या मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याTik Tok Appटिक-टॉकUnited Statesअमेरिका