शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

१६२ प्रवाशांसह विमान बेपत्ता!

By admin | Updated: December 29, 2014 06:09 IST

एअर एशियाचे इंडोनेशियातील सुराबायाहून सिंगापूरला जाणारे विमान १६२ प्रवाशांसह बेपत्ता झाले. त्यानंतर ११ तासांच्या अथक शोधानंतरही त्याचा कसलाही मागमूस लागलेला नाही

जकार्ता - सिंगापूर : एअर एशियाचे इंडोनेशियातील सुराबायाहून सिंगापूरला जाणारे विमान १६२ प्रवाशांसह बेपत्ता झाले. त्यानंतर ११ तासांच्या अथक शोधानंतरही त्याचा कसलाही मागमूस लागलेला नाही. प्रवाशांत १६ लहान मुले व नवजात अर्भक यांचा समावेश आहे. मलेशियन एअर लाइन्सच्या बेपत्ता विमानाचे गूढ कायम असतानाच झालेल्या या नव्या अपघाताने जगाला हादरवून टाकले असून, या वर्षात झालेला हा तिसरा मोठा विमान अपघात आहे. या विमानात भारतीय प्रवासी नव्हते, अशी प्राथमिक माहिती आहे. सुराबायाहून पहाटे ५.२० वाजता निघालेले हे विमान सकाळी ८.३० वाजता सिंगापूरच्या चांगी विमानतळावर उतरणार होते. विमानाने उड्डाण करून ४२ मिनिटे झाली तेव्हा खराब हवामानामुळे या विमानाच्या वैमानिकाने मार्ग बदलण्याची परवानगी मागितली होती. मात्र नंतर त्याचा संपर्क तुटला. या अपघातात कोणीही वाचले असण्याची शक्यता मावळत असून एअरबस ३२०-२०० या विमानाचा शोध घेण्यासाठी जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी इंडोनेशियाने दोन लष्करी विमाने तैनात केली आहेत. अंधार व खराब हवामानामुळे रविवारी सायंकाळी शोधमोहीम बंद करण्यात आली. काही जहाजे रात्रीही शोध घेत राहिली, पण सर्वंकष शोधमोहीम पुन्हा सोमवारी सकाळी सुरू होईल. एअर एशिया ही इंडोनेशियन हवाई कंपनी असून, अपघातग्रस्त विमानात १५५ प्रवासी व ७ कर्मचारी होते. इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानातील इंधन कधीच संपले असावे. विमानाबाबत अनेक वृत्ते येत आहेत, पण त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हे विमान सुमात्रा बेटाच्या पूर्व किनारपट्टीजवळ बालितुंग येथे कोसळले. या अपघाताचे नक्की स्थान कळलेले नाही, असे वृत्त प्रसारित होत असले तरी त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मलेशियाचे वाहतूकमंत्री लिओ तियांग लाई यांनी विमानाचे अवशेष सापडले नसल्याचे स्पष्ट केले आहे. विमान बालितुंगजवळ पडल्याचे वृत्त निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)एअर एशियाचा लोगो करडाएअर एशियाचे विमान क्यूझेड ८५०१ हे बेपत्ता झाल्यानंतर एअर एशियाने टिष्ट्वटर व फेसबुकवरील लोगोचा रंग बदलून करडा केला आहे. बेपत्ता विमानाला मार्ग बदलण्याच्या सूचना ढगांचा धोका टाळण्यासाठी विमानाला ३८ हजार फुटांवरून उडण्याचा सल्ला दिला होता. पण मार्ग बदलल्यानंतर विमानाने धोक्याचे सिग्नल दिले नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते बचावले : सुराबाया येथील एक रहिवासी अरिपुट्रो कयोनो हे आपल्या नऊ जणांच्या कुटुंबासह या विमानाने प्रवास करणार होते. मात्र त्यांचे विमान चुकल्याने ते बचावले. विमानाची वेळ ७.२० ची ५.२० झाल्याचे त्यांना माहीत नव्हते.निवेदन : एअर एशियाच्या फेसबुक पानावर कंपनीने निवेदन प्रसिद्ध केले आहे. फ्लाईट क्रमांक क्यूझेड ८५०१ सुराबाया ते सिंगापूरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आहे. आता यासंदर्भात आम्हाला दुर्दैवाने काहीही माहिती नाही. जशी माहिती मिळेल तसतशी ती आम्ही संबंधितांना देऊ, असे म्हटले आहे.दावा : हवामान खराब होते म्हणून वैमानिकाने मार्ग बदलला, असे एअर एशियाने म्हटले आहे. इंडोनेशियाच्या एटीसीने दिलेल्या माहितीनुसार, ढगांचा अडथळा टाळण्यासाठी ३२ हजार फुटांवरून ३८ हजार फुटांवर जाण्याची परवानगी वैमानिकाने मागितली होती. पण वादळी हवामान असल्याने ५० हजार फुटांपर्यंत ढग होते.