दुबई : कुवेतमधील बुर्गान तेलक्षेत्राजवळ दोन बसची रविवारी टक्कर होऊन झालेल्या अपघातात सात भारतीयांसह पंधरा तेल कर्मचारी ठार झाले. कुवेत आॅईल कंपनीसाठी ज्या विविध कंपन्या काम करतात त्यांचे कर्मचारी या दोन बसमधून प्रवास करत होते. या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये भारत, कुवेतच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
कुवेतमध्ये बस अपघातात सात भारतीयांसह १५ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 05:47 IST