सन्ना : येमेनमध्ये अंत्यसंस्कार सुरू असताना विमानातून झालेल्या हल्ल्यांमध्ये १४० पेक्षा जास्त ठार तर ५२५ जखमी झाले. हा हल्ला सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने केल्याचा दावा हुथी बंडखोरांनी केल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आघाडीकडून होत असलेल्या हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिक ठार होत असल्याबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या असून या ताज्या हल्ल्याचा इन्कार आघाडीने केला आहे. मृतांची संख्या खूपच जास्त असून ५२० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. १०० पेक्षा जास्त जण हुतात्मा झाले आहेत, असे सन्नात आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते तामिम अल-शमी यांनी बंडखोरांच्या अलमासिराह टेलिव्हीजनला सांगितले.
येमेनमध्ये हवाई हल्ल्यांत १४० ठार, ५२५ जण जखमी
By admin | Updated: October 10, 2016 04:37 IST