शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सप्टेंबरने तोडला 136 वर्षांचा रेकॉर्ड, सर्वाधिक तापमानाची नोंद

By admin | Updated: October 18, 2016 16:44 IST

सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदवण्यात आल्याने यंदाचा सप्टेंबर महिना गेल्या 136 वर्षातील सर्वात हॉट सप्टेंबर ठरला आहे.

ऑनलाइन लोकमत 
वॉशिंग्टन, दि. 18  - सातत्याने होत असलेल्या तापमान वाढीने जगभरातील हवामान तज्ज्ञ चिंतित असतानाच सरलेल्या सप्टेंबर महिन्याने त्यांच्या चिंतेत अधिकच भर टाकली आहे. सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदवण्यात आल्याने  यंदाचा सप्टेंबर महिना गेल्या 136 वर्षातील सर्वात हॉट सप्टेंबर ठरला आहे. 
नासाच्या अहवालामधून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तसेच गेल्या 12 महिन्यांपैकी 11 महिन्यांमध्ये तापमान वाढ नोंदवण्यात आल्याची माहिती या अहवालातून देण्यात आली आहे. नासाच्या गोडार्ड इन्स्टिट्युट स्पेस स्टडी (GISS) च्या शास्रज्ञांनी जागतिक तापमानाच्या केलेल्या विश्लेषणातून या सप्टेंबर महिन्यात तापमानामध्ये 0.004 डिग्री सेल्शियसने वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यंदाचा सप्टेंबर महिना सर्वाधिक उष्ण ठरला आहे. याआधी 2014 च्या सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले होते.  सप्टेंबर 2016 आणि सप्टेंबर 2014 या दोन महिन्यांतील तापमानामध्ये मोठा फरक दिसून आलेला नाही. मात्र 1951 ते 1980 या वर्षांमध्ये सप्टेंबर महिन्यात नोंदवण्यात आलेल्या तापमानान्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबरमधील तापमानात 0.91 डिग्री एवढी वाढ नोंदवण्यात आली आहे.