शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

१३० विवाह करणाऱ्या मुस्लीम प्रचारकाचे निधन

By admin | Updated: February 1, 2017 01:12 IST

इस्लाममध्ये पुरुषाला केवळ चारच नव्हे तर कितीही बायकांशी विवाह करण्याची परवानगी आहे, असा कुरआनचा अर्थ लावून स्वत:च्या आयुष्यात त्याचे पालन करणारे नायजेरियातील

इस्लाममध्ये पुरुषाला केवळ चारच नव्हे तर कितीही बायकांशी विवाह करण्याची परवानगी आहे, असा कुरआनचा अर्थ लावून स्वत:च्या आयुष्यात त्याचे पालन करणारे नायजेरियातील माजी वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक मोहम्मद बेल्लो अबुबकर यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. नायजेर राज्यातील बिदा येथे अबुबकर यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले, असे त्यांचे स्वीय सहाय्यक मुतैरु सलावुदीन बेल्लो यांनी सांगितले.‘अल्लाने नेमून दिलेले काम पूर्ण झाल्याने आता माझी जाण्याची वेळ झाली आहे. अल्लाला भेटायला माझी तयारी आहे,’असे बाबांनी (अबुबकर) जगाचा निरोप घेण्यापूर्वी आपल्याला सांगितले, असेही मुतैरू सलावुदीन म्हणाले. रविवारी अबुबकर यांच्यावर अंत्यसंस्कार झाले तेव्हा त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते, असे वृत्त ‘डेली मेल’ने दिले.सर्वसाधारणपणे इस्लामने पुरुषला चार बायका करण्याची मुभा दिली आहे, असे मानले जाते व धर्मप्रचारकही बहुधा तेच सांगत असतात. परंतु अबुबकर यांनी कुरआनचा वेगळा अर्थ लावला व जेवढ्या सहजपणे सांभाळता येतील तेवढ्या बायका मुस्लिम पुरुष करू शकतो, असा त्यांनी प्रचार केला. त्यांनी स्वत:ला उमगलेला हा कुरआनचा अर्थ आचरणातही आणला आणि ९३ वर्षांच्या आयुष्यात तबाबल १३० बायकांची लग्न केले. त्यांच्यापासून अबुबकर यांना एकूण २०३ मुले झाली. पिकल्या वयात निधन झाले तेव्हाही त्यांच्या काही पत्नी गरोदर असल्याचे सांगण्यात येते! त्यांच्या ८६ पत्नी सध्या हयात आहेत.सन २००८ मध्ये इतर धर्मप्रचारकांनी अबुबकर यांच्यावर सडकून टीका केली व फक्त चार बायका ठेवून त्यांनी इतरांना तलाक द्यावा, अशी त्यांनी मागणी केली. पण ‘शक्य असेल तोपर्यंत लग्न करत राहणे, हे मला अल्लाने नेमून दिलेले काम आहे,‘ असे सांगून अबुबकर यांनी तसे करण्यास ठाम नकार दिला होता.