शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

ताजिक पोलिसांनी उतरविल्या १३ हजार नागरिकांच्या दाढ्या!

By admin | Updated: January 22, 2016 02:54 IST

परदेशातून होणाऱ्या धार्मिक मूलतत्ववादी विचारसरणींना थोपविण्यासाठी ताजिकिस्तानच्या निधर्मी सरकारने अत्यंत कडक पावले उचलली आहेत.

दुशान्बे (ताजिकिस्तान) : परदेशातून होणाऱ्या धार्मिक मूलतत्ववादी विचारसरणींना थोपविण्यासाठी ताजिकिस्तानच्या निधर्मी सरकारने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. शेजारील अफगाणिस्तानातील अशा विचारसरणींचा प्रभाव टाळण्यासाठी ताजिक सरकार सक्रिय झाले आहे. ताजिकिस्तानच्या पोलिसांनी याचाच एक भाग म्हणून १३ हजार लोकांना दाढी उतरवण्यासाठी राजी केले आहे तर बुरखे विकणारी १६० दुकानेही पोलिसांनी बंद केली आहेत.ताजिकिस्तान हा मध्य आशियातील एक मुस्लिम बहुसंख्य देश असून त्याच्या शेजारी अफगाणिस्तान, उझबेकीस्तान, कझाखस्तान, किरगिझीस्तान, चीनचा उइघुर प्रांत आहे. त्यामुळे मुलतत्ववादी विचारसरणी आपल्या देशामध्ये शेजारील देशातून आयात केली जाऊ नये यासाठी येथील सरकार पावले उचलत आहे. त्यामुळेच दाढी, बुरखे असे संकेत पाळण्यास सरकार विरोध करत असून नागरिकांना तसे न करण्यासाठी समजावत आहे. नैऋत्य खातलॉन प्रांताचे पोलीसप्रमुख बाहरोम शरिफजोदा यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी १७०० मुली व स्त्रियांना बुरखा न वापरण्यासाठी समजावले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागच्या वर्षीच देशातील एकमेव नोंदणीकृत इस्लामी पक्ष इस्लामिक रेनेसाँ पार्टीवर बंदी आणली आहे.अफगाणिस्तानातून येणारे विचारप्रवाह थोपविण्यासाठी ताजिक संसदहीतितकीच प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. मागच्याच आठवड्यात ताजिक संसदेने मंजूर केलेल्या विधेयकानुसार अरेबिक उच्चारांची ह्यपरदेशीह्ण नावे ठेवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नातेवाईकांमध्ये विवाह करण्याची परंपराही बंद करण्यात आली आहे.देशाच्या स्थिरतेसाठी प्रयत्न -राष्ट्राध्यक्षताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमाली राहमोन यांची प्रशासनावर चांगलीच पकड आहे. ते १९९४ पासून या पदावरती असून आता ते चौथ्यांदा निवडून आले आहेत. त्यांचा कार्यकाळ २०२० साली संपणार आहे. राहमोन आणि त्यांच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचा खटला चालविता येणार नाही अशी सूट संसदेने मंजूर केली आहे. ही सूट त्यांच्यासाठी आजीवन लागू झाली आहे.