शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणमध्ये हिमस्खलनात १२४ जणांचा बळी; वीज खंडित

By admin | Updated: February 25, 2015 23:48 IST

अफगाणिस्तानातील हिमस्खलनात १२४ जणांचा बळी गेल्याची भीती आपत्कालीन सेवेच्या एका अधिका-याने बुधवारी व्यक्त केली. प्रचंड बर्फवृष्टीमुळे हिमस्खलन होऊन अनेक घरे थंड ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचे हा

काबूल : अफगाणिस्तानातील हिमस्खलनात १२४ जणांचा बळी गेल्याची भीती आपत्कालीन सेवेच्या एका अधिका-याने बुधवारी व्यक्त केली. प्रचंड बर्फवृष्टीमुळे हिमस्खलन होऊन अनेक घरे थंड ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचे हा अधिकारी म्हणाला. हिमस्खलनाचा चार प्रांताना फटका बसला असला तरी पांजशिर प्रांतात सर्वाधिक हानी झाली आहे. प्रभावित प्रांत देशाच्या ईशान्येकडील असून तेथे गेल्या दोन दिवसांपासून हिमपात सुरू आहे. अफगाणिस्तानच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उपसंचालक मोहंमद असलम सयास यांनी हिमस्खलन बळींचा आकडा दिला. एकट्या पांजशिर प्रांतात १०० घरे जमिनदोस्त झाली किंवा त्यांची हानी झाली, असे ते म्हणाले. हा प्रांत राजधानी काबूलपासून १०० कि. मी.वर ईशान्येकडे आहे. अफगाणिस्तानातील हिवाळा एरवी सौम्य व कोरडा असतो. मात्र, यावेळी शक्तीशाली हिमवादळाने त्यात व्यत्यय आणला. परिणामी देशाचा मोठ्या भुभागावर बर्फाची चादर पसरली आहे. बर्फ साचून मुख्य रस्ते बंद झाल्यामुळे प्रभावित गावांमध्ये पोहोचणे बचाव पथकांना कठीण झाले आहे. हिमवादळ आणि हिमस्खलनाने सलांग खिंडीत वीजवाहिन्यांची हानी झाल्यामुळे काबूलच्या अनेक भागांत मंगळवारी वीजपुरवठा खंडित राहिला. सलांग खिंड वाहतुकीसाठी आजही बंद ठेवण्यात आली. अफगाणिस्तानातील उंच पहाडी भागात हिवाळ्यात दरवर्षी हिमस्खलन होते. २०१२ मध्ये अशाच एका हिमस्खलनात १४५ लोक बेपत्ता झाले होते. (वृत्तसंस्था)