शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आयफोन परत घेतला म्हणून १२ वर्षाच्या मुलीने केला आईच्या हत्येचा प्रयत्न

By admin | Updated: March 23, 2015 14:35 IST

आय फोन परत घेतला म्हणून १२ वर्षाच्या मुलीने लागोपाठ दोन वेळा आईची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अमेरिकेत घडली आहे.

ऑनलाइन लोकमत 
कॉलोरेडो, दि. २३ - आय फोन परत घेतला म्हणून १२ वर्षाच्या मुलीने लागोपाठ दोन वेळा आईची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अमेरिकेत घडली आहे.  दुस-या प्रयत्नानंतर मुलीवर संशय आल्यावर मुलीच्या आईने पोलिसांशी संपर्क साधला व या सर्व प्रकरणाचा खुलासा झाला. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून तिला उपचारानंतर घरीदेखील सोडण्यात आले आहे. 
अमेरिकेतील कोलोरेडो येथे राहणा-या एका महिलेने तिच्या १२ वर्षाच्या मुलीकडील आय फोन परत घेतला होता. आईच्या या निर्णयावर मुलगी संतापली व तिने थेट आईच्या हत्येचा कट रचला. २ मार्च रोजी तिने आईच्या ज्यूसमध्ये ब्लीच (साफसफाई वापरले जाणारे केमिकल) टाकून दिले. ज्यूस पित असताना महिलेला ग्लासमध्ये ब्लीचचा वास आला व तिने ज्यूस फेकून दिले. मुलीने ग्लास नीट न धुतल्याने ब्लीचचा वास येत असावा असे तिला वाटले. मात्र दोन दिवसांपूर्वी तिला ज्यूसमध्ये पुन्हा ब्लीचचा वास आला. यानंतर तिने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले व चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून मुलीची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे. तिच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.