शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जगात वर्षभरात ११० पत्रकारांची हत्या

By admin | Updated: December 30, 2015 02:12 IST

मावळत्या वर्षात जगभरात ११० पत्रकारांची हत्या करण्यात आली. यापैकी बहुतांश जणांना शांततामय देशात ठरवून लक्ष्य करण्यात आले, असे ‘रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स’ने (आरएसएफ) मंगळवारी येथे सांगितले.

पॅरिस : मावळत्या वर्षात जगभरात ११० पत्रकारांची हत्या करण्यात आली. यापैकी बहुतांश जणांना शांततामय देशात ठरवून लक्ष्य करण्यात आले, असे ‘रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स’ने (आरएसएफ) मंगळवारी येथे सांगितले. आरएसएफने आपला वार्षिक अहवाल सादर करताना म्हटले की, यंदा ६७ पत्रकार ड्यूटीवर असताना मारले गेले, तर ४३ जणांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याशिवाय २७ सिटीजन जर्नालिस्टही मारले गेले आहेत.माध्यम कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना अपयशी ठरल्याचे यातून प्रतिबिंबित होते. अहवालामध्ये संयुक्त राष्ट्राला पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतात २०१५ च्या प्रारंभीपासून नऊ पत्रकार ठार झाले आहेत. यातील काहींना संघटित गुन्हेगारी आणि राजकीय नेत्यांशी संबंधित वृत्तांकन करताना, तर इतरांना अवैध उत्खननाचे वार्तांकन करताना प्राण गमवावे लागले. भारतात ड्यूटीवर असताना पाच पत्रकारांचा मृत्यू झाला, तर इतर चौघांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. आरएसएफने पत्रकारांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय योजना अमलात आणण्याचे आवाहन भारत सरकारला केले आहे.