शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक हल्ल्यात 100 जण मृत्युमुखी

By admin | Updated: April 5, 2017 07:14 IST

सीरियामधील इदबील प्रांतात मंगळवारी झालेल्या रासायनिक हल्ल्यात सुमारे १०० जण मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये लहान मुुलांचाही समावेश आहे.

 ऑनलाइन लोकमत 

दमास्कस, दि. 4 - सीरियामधील इदबिल प्रांतात मंगळवारी झालेल्या रासायनिक हल्ल्यात सुमारे 100 जण मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये लहान मुुलांचाही समावेश आहे. तसेच 400हून अधिक जण हल्ल्यात बाधित होऊन आजारी पडले आहेत. 

सीरियन ऑब्झर्वेट्री फॉर ह्युमन राइट्सने सांगितले की, हा हल्ला सीरियातील इदलिब प्रांतातील खान शयखून येथे झाला. वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यानंतर श्वास गुदमरून लोकांचा मृत्य झाला. तर सीरियातील विरोधी पक्षांच्या उच्चस्तरीय समितीने  या हल्ल्यात सुमारे 100 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. मात्र या हल्लासाठी वापरण्यात आलेली विमाने सीरियातील होती की सीरियन सरकारचे मित्र राष्ट्र असलेल्या रशियाची हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

दरम्यान, क्लोरिन गॅसचे चार थर्मोबेरिक बॉम्ब टाकण्यात आल्याचा दावा मंगळवारी एका फेसबुक पोस्टवरून करण्यात आला होता.  अंतर्गत बंडाळी आणि आयएसआयएच्या कारवायांनी उद्ध्वस्त झालेल्या सीरियाच्या भवितव्याबाबत निर्णय घेण्यासाठी युरोपियन महासंघ आणि संयुक्त राष्ट्रांनी ब्रुसेल्स येथे दोन दिवसीय संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनापूर्वीच रासायनिक हल्ल्याची ही घटना घडली आहे.  एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, मी जेव्हा पाहिलं तेव्हा लोक जमिनीवर पडून होती. मात्र त्यांच्यात चालण्याची ताकद नव्हती. अनेक लहान मुलांचा श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाला. मात्र हा हल्ला सीरियानं केला नसल्याचा दावा सीरियन सैन्यानं केला आहे. लष्कराकडून याआधीही कधी रासायनिक शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला नाही आणि यापुढेही कधी करणार नाही, असं सीरियाच्या लष्करानं सांगितलं आहे. हा हल्ला बंडखोरांनी केल्याचा आरोप सीरियनं सैन्यानं केला आहे. तसेच अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनं या हल्ल्याचा राष्ट्रपाती बसर-अल- असद यांना जबाबदार धरलं आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी या नरसंहारावरून सीरियाच्या राष्ट्रपतींवर टीका केली आहे.