शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबियातील अग्नितांडवात 10 भारतीयांचा होरपळून मृत्यू

By admin | Updated: July 13, 2017 12:54 IST

सौदी अरेबियामध्ये बुधवारी (12 जुलै ) रात्री एका घराला लागलेल्या आगीत 10 भारतीयांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. 13 - सौदी अरेबियामध्ये बुधवारी (12 जुलै ) रात्री एका घराला लागलेल्या भीषण आगीत 10 भारतीयांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर अन्य 6 जण जखमी झाले आहेत.  या दुर्घटनेबाबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. दुर्घटनेनंतर जेद्दाह येथील भारतीय दुतावासाचे अधिकारी नजरान येथे रवाना झाले आहेत. या अग्नितांडवात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे मात्र त्याची ओळख पटवण्यात आलेली नाही. 
 
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटद्वारे सांगितले की, माझा जेद्दाह येथील कॉन्सल जनरलसोबत संपर्क झाला आहे. नजरान येथे घडलेल्या या अग्नितांडवात 10 भारतीय नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार  सुरू आहेत. विद्या एस. नावाच्या एका महिलेच्या पतीचा या अग्नितांडवात मृत्यू झाला. आपल्या पतीचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी विद्यानं परराष्ट्र मंत्रालयाकडे ट्विटद्वारे मदतीची मागणी केली. या ट्विटला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दुर्घटनेबाबतची माहिती दिली. 
 
पुढे त्यांनी असेही सांगितले की, नजरान जेद्दाहपासून 900 किलोमीटर अंतरावर आहे. आपल्या कॉन्सल जनरल नजरान येथील गव्हर्नरच्या संपर्कात आहेत आणि तेथील प्रत्येक घडामोडीबाबत मला माहिती देत आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पावलेले सर्व जण एका कन्स्ट्रक्शन कंपनीतील कर्मचारी होते. दरम्यान, अग्नितांडवाची ही घटना शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.