शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

CoronaVirus News: मानलं राव! या जिल्हाधिकाऱ्यांची दूरदृष्टीच भारी; इथं ना ऑक्सिजनचा तुटवडा, ना बेड्सची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 10:05 IST

CoronaVirus News: ऑक्सिजनच्या बाबतीत नंदूरबार जिल्हा स्वयंपूर्ण; जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक

नंदूरबार: औषधांचा, ऑक्सिजनचा तुटवडा, बेड्सची कमतरता, रेमडेसिविर इंजेक्शनचा अपुरा पुरवठा या सगळ्या गोष्टींची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असताना सगळीकडे वैद्यकीय यंत्रणेवर खूप मोठा ताण आला आहे. अनेक ठिकाणी वेळेवर उपचार न मिळाल्यानं कोरोना रुग्ण दगावले आहेत. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना राज्यांमध्ये घडत असताना नंदूरबारमधील परिस्थिती मात्र पूर्णत: वेगळी आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची दूरदृष्टी आणि त्यांनी केलेलं नियोजन यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे.पुरेसा साठा नसल्याने लसीकरण अडचणीत; ४० खासगी केंद्रांवर लसीकरण आज बंदआदिवासीबहुल अशी नंदूरबार जिल्ह्याची ओळख. गेल्या वर्षीपासून नंदूरबारनं कोरोनाशी दोन हात करण्यास सुरुवात केली. त्यावेळी जिल्ह्यात २० बेड्स होते. सध्याच्या घडीला जिल्ह्यातल्या रुग्णालयांत एकूण १ हजार २८९ बेड्स आहेत. तर कोविड केअर सेंटर्समध्ये १ हजार ११७ बेड्स आहेत. याशिवाय ग्रामीण रुग्णालयांत ५ हजार ६२० बेड्स उपलब्ध आहेत. शाळा, वसतिगृहं, सोसायट्या, मंदिरांनादेखील बेड्स पाठवण्यात आले आहेत. इतकंच नव्हे, तर ७ हजारहून अधिक आयसोलेशन बेड्स आणि १ हजार ३०० आयसीयू बेड्सदेखील जिल्ह्यात उपलब्ध आहेत.कोरोना चाचण्या करण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर;देशात उत्तर प्रदेशमधील परिस्थिती सर्वात वाईटसुरुवातीला ऑक्सिजनसाठी इतर जिल्ह्यांवर अवलंबून असलेला नंदूरबार जिल्हा आज ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला आहे. संपूर्ण राज्यात, देशात ऑक्सिजनची कमतरता जाणवत असताना जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांच्या दूरदृष्टीमुळे नंदूरबारवर तशी वेळ आलेली नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे, बायकॉनच्या चेअरपर्सन किरण मुझूमदार शॉ, रेल्वे मंत्री पियूष गोयल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे अशा दिग्गजांनी डॉ. भारूड यांच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. संपूर्ण जिल्ह्यात नंदूरबार मॉडेल राबवण्याची घोषणा राजेश टोपेंनी केली आहे. यावरून भारूड यांच्या कार्याची प्रचिती येऊ शकेल.देशातील 150 जिल्ह्यांत संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता; निर्णय लवकरच२०१३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले डॉ. भारूड यांनी केईएम रुग्णालयातून एमबीबीएस केलं आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक असेल याचा अंदाज भारूड यांना होता. त्यामुळे डिसेंबरपासूनच त्यांनी यासाठी जिल्ह्यातली यंत्रणा सज्ज ठेवण्यास सुरुवात केली. नंदूरबारमध्ये गेल्या वर्षी दिवसाला सरासरी १९० कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा १२०० पर्यंत जाऊन पोहोचला आहे. भारूड यांच्या नेतृत्त्वाखाली कोरोना चाचण्यांची क्षमता थेट १०० पटीनं वाढून १५०० पर्यंत गेली आहे.जिल्हा विकास निधी आणि एसडीआरएफच्या निधीतून डॉ. भारूज यांनी जिल्ह्यात ३ ऑक्सिजन प्लांट सुरू केले आहेत. इथे दर मिनिटाला ३ हजार लीटर ऑक्सिजन तयार होत आहे. ऑक्सिजन तयार करण्यासाठी लिक्विड टँक उभारण्याचं कामदेखील सुरू आहे. कोरोना रुग्णांसाठी गेल्या ३ महिन्यांत २७ रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. डॉ. भारूड यांनी दाखवलेल्या दूरदृष्टीचं आणि केलेल्या नियोजनाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या