शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघ कागदावर मजबूत, पाक प्रशिक्षक फरहत खान यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 04:11 IST

पाकिस्तान हॉकी संघाचे प्रशिक्षक फरहत खान यांनी बांगलादेशात पुढील महिन्यात होणा-या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ हा कागदावर मजबूत संघ असल्याचे म्हटले आहे.

ढाका : पाकिस्तान हॉकी संघाचे प्रशिक्षक फरहत खान यांनी बांगलादेशात पुढील महिन्यात होणा-या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ हा कागदावर मजबूत संघ असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानला भारत, जापान आणि यजमान बांगलादेशसोबत पूल ए मध्ये ठेवण्यात आले आहे. ११ आॅक्टोबरला पाकिस्तानचा पहिला सामना यजमान बांगलादेशविरुद्ध, १३ आॅक्टोबरला जापान आणि १५ रोजी भारतासोबत होईल.फरहत यांनी सांगितले की,‘स्पर्धेत सहभागी झालेल्या आशियाई संघांमध्ये कडवी स्पर्धा आहे. जागतिक रँकिंगमध्ये सहाव्या क्रमांकावर असलेला भारतीय संघ कागदावर मजबूत आहे. मात्र अनेक संघ कधीही प्रतिस्पर्ध्यांना चकित करून सोडतात. मलेशियाने लंडनमध्ये विश्व हॉकी लीग सेमीफायनलमध्ये भारताला पराभूत केले. त्यामुळे आम्ही खेळावर लक्ष देऊ.’’फरहत पुढे म्हणाले की, ‘आम्हाला खेळातील प्रत्येक विभागाकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या काही काळापासून आमच्या संघाला कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. तसेच, गेल्या विश्वचषक आणि रियो आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये पात्रता मिळवण्यातही आम्ही अपयशी ठरलो. त्यामुळे आशिया कपमध्ये आम्ही सर्वोत्तम खेळ करण्यास उत्सुक आहोत.’ (वृत्तसंस्था)