शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा बलाढ्य बेल्जियमला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 04:25 IST

प्रो लीग हॉकी । पहिल्या सामन्यात २-१ ने विजय

भुवनेश्वर : भारताच्या पुरुष हॉकी संघाने शनिवारी एफआयएच प्रो लीग हॉकीच्या पहिल्या सामन्यात जग्गजेत्या बेल्जियमला २-१ ने पराभवाचा धक्का दिला. भारताने पहिल्या फेरीत नेदरलँडला पराभूत केले होते.भुवनेश्वर येथील कलिंगा हॉकी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने धडाकेबाज खेळ केला. बेल्जियमचा संघ गुणतालिकेत ११ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. या लीगमध्ये बेल्जियम अपराजित होता. मात्र भारतात पहिल्याच सामन्यात बेल्जियमला धक्का बसलेला आहे.भारतीय खेळाडूंनी पहिल्या सत्रापासूनच आक्रमक खेळावर भर दिला. भारतीय आघाडीपटूंनी बेल्जियमच्या बचावपटूंवर दबाव आणला. मनदीपसिंग याने सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवून आघाडी मिळवून दिली. बेल्जियमने सामन्यात पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले. मात्र, मध्यांतरापर्यंत भारताने आपली १-० अशी आघाडी टिकवून ठेवली. भारताचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने बेल्जियमच्या आघाडीच्या खेळाडूंच्या चाली हाणून पाडल्या.सामन्याच्या ३३ व्या मिनिटाला गौतियर बोकार्ड याने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून बेल्जियमला १-१ अशी बरोबरी साधून दिली. तथापि, रमनदीपसिंग याने ४७ व्या मिनिटाला नोंदविलेला गोल सामन्यात निर्णायक ठरला. रमनदीपने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविला.जागतिक हॉकी क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाने स्थानिक चाहत्यांपुढे कलिंगा स्टेडियमवर अव्वल स्थानावरील बेल्जियमला धूळ चारताच आनंदाला उधाण आले होते. उभय संघांदरम्यान आज, रविवारी दुसरा सामना खेळला जाणार आहे. (वृत्तसंस्था)