शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कोच रोलँट ओल्टमन्स यांची हकालपट्टी, हॉकी इंडियाकडून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 05:49 IST

हॉकी इंडियाने शनिवारी राष्ट्रीय संघाचे मुख्य कोच रोलँट ओल्टमन्स यांची खराब कामगिरीबद्दल हकालपट्टी केली. संघाचे ‘हाय परफॉर्मन्स’ संचालक डेव्हिड जॉन सध्या अंतरिम कोच म्हणून कामकाज पाहतील.

नवी दिल्ली : हॉकी इंडियाने शनिवारी राष्ट्रीय संघाचे मुख्य कोच रोलँट ओल्टमन्स यांची खराब कामगिरीबद्दल हकालपट्टी केली. संघाचे ‘हाय परफॉर्मन्स’ संचालक डेव्हिड जॉन सध्या अंतरिम कोच म्हणून कामकाज पाहतील. हॉकी इंडियाच्या हाय परफॉर्मन्स आणि विकास समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.हॉकी इंडियाच्या निवड समितीचे प्रमुख हरविंदरसिंग म्हणाले, ‘आम्ही २०१६ आणि २०१७ या मोसमातील पुरुष हॉकी संघाच्या कामगिरीवर समाधानी नाही. आशियातील विजय हा यशाचा मापदंड होऊ शकत नाही, असे आमचे मत आहे. आम्हाला गेली दोन वर्षे आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये हवे तसे यश मिळाले नाही. यशासाठी आम्हाला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. कोचिंगची सध्याची पद्धत एका मर्यादेपेक्षा अधिक यश मिळवून देऊ शकत नाही. यावर लगेचतोडगा काढायची गरज आहे.बदल एका रात्रीतून होत नाही.२०१८ चे आशियाड, विश्वकपआणि २०२० च्या आॅलिम्पिकमध्ये देदीप्यमान यशासाठी आमूलाग्र बदल आवश्यक आहेत.’‘वारंवारकोच बदलणे नुकसानदायक’नवी दिल्ली : रोलँट ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीवर आश्चर्य व्यक्त करून भारतीय हॉकी संघाचे माजी कोच जोस ब्रासा यांनी वारंवार कोच बदलणे भारतीय संघाच्या हिताचे नसल्याचे म्हटले आहे.२००९-१० या मोसमात भारताचे कोच राहिलेले ब्रासा यांनी स्पेनमधून वृत्तसंस्थेशी बोलताना ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीबाद्दल आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘रोलँट जगातील सर्वोत्कृष्ट कोच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारत चांगला खेळत होता. त्यांचा पर्याय शोधणे कठीण असेल.’’ब्रासा यांच्यासोबतदेखील हॉकी इंडियाने दोन वर्षांचा करार केला होता; पण ग्वांग्झू एशियाड (२०१०)नंतर त्यांची हकालपट्टी झाली होती. युक्रेनच्या राष्टÑीय महिला संघाचे सल्लागार असलेले ब्रासा म्हणाले, ‘‘वारंवार कोच बदलल्याने संघाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होतो.’’हॉकी इंडियात खेळाची पार्श्वभूमी लाभलेल्या लोकांचा अभाव, हीच भारतात मुख्य समस्या असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.हॉकी चालविणाºयांना खेळाची माहिती नाही. जगभर होतअसलेल्या बदलाची माहिती नसणे, हे मूळ कारण आहे. भारताला देशीनव्हे, तर विदेशी कोचचीच गरज असल्याचे मत त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी दिले.भारतात एकही हॉकी विद्यापीठ नाही. विदेशी कोच आधुनिक माहितीसह अनुभव सोबत घेऊन येतो, असे त्यांनी स्वत:चा मुद्दा पुढे रेटताना सांगितले. भारतात हॉकी प्रतिभेची उणीव नाही; पण त्यांना आधुनिक प्रशिक्षण देणारे मार्गदर्शक नाहीत. भारतीय संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार होण्यासाठी कोचला अधिक वेळ देणे गरजेचे आहे, असे ब्रासा यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)गेल्या काही वर्षांत सात कोच बदलले गेले. नेदरलँड्सचे पॉल वॉन अ‍ॅस, आॅस्ट्रेलियाचे टेरी वॉल्श, मायकेल नोब्स आणि रिक चार्ल्सवर्थ यांनादेखील वादग्रस्त स्थितीत निरोप देण्यात आला. विश्व दर्जाच्या संघबांधणीसाठी दीर्घ काळासाठी कोचची नियुक्ती व्हायला हवी. ही ‘जादूची छडी’ नाही. खेळाडूंना समजून घ्यायला बराच वेळ लागतो.-जोस ब्रासा, माजी कोच भारत