शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 02:11 IST

भारताने आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाला २-१ ने पराभूत करीत चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आज येथे सलग दुसरा विजय मिळवला आहे.

ब्रेडा, नेदरलँड : भारताने आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाला २-१ ने पराभूत करीत चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आज येथे सलग दुसरा विजय मिळवला आहे. भारताने दोन गोल दुसऱ्या क्वार्टरमध्ये केले. हरमनप्रीतसिंह याने १७ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला, तर मनदीप याने २८ व्या मिनिटाला गोल करीत ही आघाडी दुप्पट केली.विश्व रँकिंगमध्ये दुसºया स्थानावर असलेला अर्जेंटिनाचा ड्रॅगफ्लिकर गोंजालो पेईलाट याने ३० व्या मिनिटाला एकमेव गोल केला.पहिल्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचे स्वप्न पाहत असलेल्या भारताने कालच्या सामन्यात पाकिस्तानला ४-० ने पराभूत केले होते.सहा देशांच्या या स्पर्धेत भारत दोन सामन्यांतील विजयांसह गुणतक्त्यात अव्वल स्थानावर आहे. आठ वेळच्या आॅलिम्पिकविजेत्या भारताचा पुढचा सामना विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियासोबत २७ जून रोजी होईल.सामन्याच्या १७ व्या मिनिटाला संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर हरमनप्रीतसिंह याच्या ड्रॅग फ्लिकवर चेंडू अर्जेंटिनाचा गोलकीपर तोमास सँटियागो याच्या पायातून निघून गेला. मध्यंतराच्या दोन मिनिटे आधी मनदीप याने गोल करीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.त्यानंतर दोनच मिनिटांत अर्जेंटिनाच्या संघाने गोल करीत आघाडी कमी केली. पेनल्टी कॉर्नरवर पेईलाटचा जोरदार शॉट भारताचा श्रीजेश रोखू शकला नाही.