शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मलेशियाला नमवत भारताने जिंकले कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 02:30 IST

विशाल अंतिल याने केलेल्या दोन गोलच्या बळावर भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाने आज येथे यजमान मलेशियाचा ४-0 असा पराभव करताना सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत कास्यपदक जिंकले.

जोहोर बारू : विशाल अंतिल याने केलेल्या दोन गोलच्या बळावर भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाने आज येथे यजमान मलेशियाचा ४-0 असा पराभव करताना सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत कास्यपदक जिंकले.तमन दया हॉकी स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत भारताकडून अंतिलने १५ व्या आणि २५ व्या मिनिटाला असे दोन गोल केले. भारताला विवेक प्रसादने ११ व्या मिनिटाला गोल करीत आघाडी मिळवून दिली, तर शैलानंद लाकडाने २१ व्या मिनिटाला संघाकडून तिसरा गोल केला. अशा प्रकारे भारताने कास्यपदक जिंकताना या स्पर्धेचा समारोप केला.त्याआधी भारत ९ गुणांसह गुणतालिकेत तिसºया स्थानावर राहिला होता. त्यांनी आज शानदार सुरुवात करताना पहिल्या क्वार्टरमध्ये मलेशिया गोलपोस्टवर जोरदार हल्ले केले. फायनलमध्ये न पोहोचण्यामुळे झालेली निराशा विसरताना भारतीय संघाने आपल्या कौशल्याचे जोरदार प्रदर्शन केले. कर्णधार विवेक प्रसादने ११ व्या मिनिटाला मनिंदरसिंहच्या पासवर गोल करताना संघाचे खाते उघडले. चार मिनिटांनंतर दिलप्रीतसिंहच्या मोठ्या पासवर शैलानंद लकडाने चांगल्याप्रकारे नियंत्रण मिळवले आणि पुन्हा त्यांनी विशाल अंतिलकडे हा पास दिला आणि अंतिलने त्यावर सहज गोल केला.दुसºया क्वार्टरमध्येदेखील याचीच पुनरावृत्ती झाली आणि भारतीयांनी दबाव ठेवला. खेळाच्या २१ व्या मिनिटाला विवेक प्रसादच्या पासवर शैलानंदने तिसरा गोल केला. त्यानंतर भारतीय संघाने प्रतिस्पर्ध्यांना डोके वर काढण्याची संधी दिली नाही आणि २५ व्या मिनिटाला दिलप्रीतच्या पासवर विशालने गोल करीत भारताची आघाडी ४-0 अशी केली. मलेशियाने पुढील दोन क्वार्टरमध्ये मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला; परंतु भारतीय बचावफळीने त्यांना संधी दिली नाही. भारतीय गोलकिपर सेंतामिज शंकरनेदेखील खूप चांगला बचाव करताना भारतीय संघाच्या विजयात योगदान दिले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडा