शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बेल्जियमचा भारतावर ३-१ ने विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:57 IST

भारताच्या पुरुष हॉकी संघासाठी सध्याचा युरोप दौरा अतिशय खडतर ठरत आहे. बेल्जियमने शुक्रवारी सलग दुसºया सामन्यात भारतावर ३-१ ने विजय नोंदविला.

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष हॉकी संघासाठी सध्याचा युरोप दौरा अतिशय खडतर ठरत आहे. बेल्जियमने शुक्रवारी सलग दुसºया सामन्यात भारतावर ३-१ ने विजय नोंदविला.प्रारंभी एक गोलने माघारल्यानंतरही यजमान संघाने शानदार खेळ करीत मुसंडी मारली. याआधी बुधवारी सलामीच्या सामन्यात या संघाने भारताचा १-० ने पराभव केला होता. भारताचा युवा गोलकिपर सूरज करकेरा याने पहिल्या काही मिनिटांत अप्रतिम कामगिरी करीत बेल्जियमचे सर्व हल्ले निष्फळ ठरविले.या दौºयात भारताने युवा संघ पाठविला आहे. सिनियर राष्टÑीय संघात सहा नव्या चेहºयांना संधी दिली. भारताने धडक सुरुवात केली. चौथ्या मिनिटाला अरमान कुरेशी याने गोलदेखील नोंदविला. भारताला आघाडी दुप्पट करण्याची संधी होती; पण पेनल्टी कॉर्नरवर गोल होऊ शकला नाही. भारतीय खेळाडूंनी मात्र बेल्जियमच्या गोलकिपरला सातत्याने त्रास दिला. कुरेशीने यानंतरही दोनदा हल्ले केले; पण गोलकिपरने भारताचे मनसुबे हाणून पाडले. भारताची आघाडी फार वेळ टिकू शकली नाही. पाच मिनिटांनंतर बेल्जियमने बरोबरी साधली. अमोरी कायस्टर्स याने नवव्या मिनिटाला गोल केला.दुसºया क्वार्टरमध्ये बेल्जियमची कामगिरी अधिकच चांगली होती. लोइक लायपाएर्ट याने २१ व्या मिनिटाला ड्रॅग फ्लिकवर दुसरा गोल नोंदविला. मध्यंतराच्या काही सेकंद आधी व्हिक्टर व्हॅगनेज याने तिसरा गोल नोंदविताच भारत १-३ ने माघारला.माघारल्यानंतर भारताने तिसºया क्वार्टरमध्ये गोल नोंदविण्याचा प्रयत्न केला होता; पण मनदीपच्या डिफ्लेक्शनवर सुमित गोल नोंदवू शकला नाही. अखेरच्या क्वार्टरमध्येही मनदीप, कुरेशी आणि रमणदीप यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. बेल्जियमची बचाव फळी फारच भक्कम होती.आता भारताला नेदरलॅन्डमधील वॉलविज्क येथे १३ आणि १४ आॅगस्ट रोजी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर १६ आॅगस्ट रोजी आॅस्ट्रियाविरुद्ध एकमेव सामना खेळला जाईल.भारतासाठी मिडफिल्डर चिग्लनेसनासिंग याचा आज १५० वा आंतरराष्टÑीय सामना होता. मणिपूरच्या या खेळाडूने २०११ मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध चॅम्पियन्स चॅलेंज स्पर्धेद्वारे भारतीय संघात पदार्पण केले. तेव्हापासून तो सातत्याने देशासाठी खेळत आहे. (वृत्तसंस्था)