शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वाकोडीच्या जिल्हा परिषद शाळेला आग; कार्यालयातील कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य जळून १० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 19:06 IST

आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास शाळेच्या मुख्य कार्यालयास आग लागली. ही माहिती शाळच्या परिसरात खेळत असलेल्या मुलांनी ग्रामस्थांना दिली.

वाकोडी ( हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील जिल्हा परिषद शाळेस आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत कार्यालयातील संगणक, कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य जळून  जवळपास दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती सरपंच सुलोचनाबाई नाईक यांनी दिली.

वाकोडी येथे जिल्हा परिषदेची पाचवी ते दहावीपर्यत शाळा आहे. आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास शाळेच्या मुख्य कार्यालयास आग लागली. ही माहिती शाळच्या परिसरात खेळत असलेल्या मुलांनी ग्रामस्थांना दिली. यानंतर ग्रामस्थांनी मिळेल त्या भांड्यात पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विठ्ठल कदम यांनी कळमनुरी येथील अग्नीशमन कार्यालयाला दूरध्वनी केला. अर्ध्या तासामध्ये कळमनुरी येथील अग्नीशमन वाकोडी येथे दाखल झाले. 

अग्नीशमनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मुख्य कार्यालयाला लागलेली आग आटोक्यात आणली. परंतु, अग्नीशमन गाडी येईपर्यत कार्यालयातील शैक्षणिक साहित्य, संगणक, कपाट, इतर बाहेर ठेवलेले रेकॉर्ड जळून खाक झाले. सायंकाळी पावणेसहा वाजता आग पूर्णत: आटोक्यात आली. या आगीत दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, गावकऱ्यांनी शाळेचे शिक्षक पारसकर यांना शाळेला आग लागल्याची माहिती दिली. परंतु, मी बाहेर असल्याचे त्यांनी यावेळी गावकऱ्यांना सांगितले. तर मुख्याध्यापकांचा फोन लागला नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी तंटामुक्तीचे अध्यक्ष विश्वनाथ काकडे, ग्रा. पं. सदस्य बबन गायकवाड, विकास जाधव, किरण काकडे, मारोती जाधव, किरण राऊत, विठ्ठल कदम व गावकऱ्यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाHingoliहिंगोली