शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'येडशी'तील मारावर काळाची फुंकर

By admin | Updated: January 30, 2015 14:53 IST

येडशी येथे चक्क पोलिसांनाच बदडून काढल्याने पोलिस खात्याची अब्रू वेशीवर टांगली गेली होती. निदान या प्रकरणात तरी आरोपी लवकर पकडले जातील, असे अपेक्षित असताना पोलिस गप्पगार बसले आहेत.

 हिंगोली : /कळमनुरी/ तालुक्यातील येडशी येथे चक्क पोलिसांनाच बदडून काढल्याने पोलिस खात्याची अब्रू वेशीवर टांगली गेली होती. निदान या प्रकरणात तरी आरोपी लवकर पकडले जातील, असे अपेक्षित असताना पोलिस गप्पगार बसले आहेत.येडशी येथील यात्रेत कुस्त्यांची दंगल सुरू असताना हा प्रकार घडला होता. आदल्या दिवशी पोलिसांनी अवैध धंदे बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यात काहींना 'प्रसाद' दिला. दुसर्‍या दिवशी हीच मंडळी पोलिसांना प्रसन्न झाली. त्यांनी चक्क पोलिसांकडून सव्याज वसुली केली. ज्यांनी हे कृत्य केले त्यातील अनेक गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. मात्र पोलिसांची त्यांना कुठलीच भीती नाही, हे तेव्हाच अधोरेखित झाले होते. ती भीती का नाही, हे तपासाची गती पाहून लक्षात येत आहे. दुसर्‍या दिवशी गावात आयत्याच सापडलेल्या पाच जणांना पकडले अन् तेवढय़ावरच समाधान मानावे लागले. हा भाग संवेदनशील आहे. पोलिस ठाण्याचा आवाकाही मोठा आहे. शिवाय एकामागून एक प्रकरणांचा धडाकाही तेथेच सुरू आहे. इतर प्रकरणांच्या तपासात पोलिसांची गती मंद असते. निदान त्यांनाच कोणी बकलून काढल्यावर तरी जोमात चक्रे फिरतील, असे अपेक्षित होते. मात्र कातडी गेंड्यांचीच. त्यावर चार-दोन दंडे पडलेही तर फरक काय तो पडणार? असे लोकांना वाटत आहे. तर जणू काही घडलेच नाही, या थाटात पोलिस वावरत आहेत. यात राजकीय दबावाचाही गंध येत आहे. परंतु कर्तव्यदक्षतेचा आव आणणारे व कुठल्याही दबावाला बळी पडत नसल्याचे सांगणारे पोलिस दल त्यामुळे तर चुप्पी साधून नाही? असाही प्रश्न आहे. /(जिल्हा प्रतिनिधी) कुस्त्यांच्या दंगली यात्रांतून बाद! येडशीत कुस्त्यांची दंगल सुरू असताना घडलेल्या प्रकारामुळे वारंगा फाटा परिसरातील अनेक ठिकाणच्या यात्रांतून कुस्त्यांच्या दंगलीच बाद झाल्या आहेत. त्यात वारंगा येथील स्पर्धेचाही समावेश आहे. तोंडापूर, कुर्तडी येथेही तेच घडले. विशेष म्हणजे काही ठिकाणी मल्लच भीतीपोटी आले नाही तर काही ठिकाणी आयोजकांनी नको ती झंझट म्हणून या स्पर्धा घेतल्या नाहीत. केवळ एका घटनेमुळे या स्पर्धांवर परिणाम होत असेल तर ही बाब लाजीरवाणी आहे. पोलिस दलाने याचा गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे. येडशीत गमावलेला लोकांचा विश्‍वास परत मिळविण्यासाठी पोलिसांना मात्र कृतीतून सिद्धता दाखवावी लागणार आहे.