शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे रुपयांसाठी बँकेत काढावे लागणार हजाराचे खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:19 IST

हिंगोली : २०२१ मधील उन्हाळ्यातील शालेय पोषण आहाराच्या बदल्यात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पोषण आहाराच्या किमतीएवढी रक्कम जमा करण्याचा निर्णय ...

हिंगोली : २०२१ मधील उन्हाळ्यातील शालेय पोषण आहाराच्या बदल्यात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पोषण आहाराच्या किमतीएवढी रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून केवळ दीडशे ते सव्वादोनशे रुपयेच खात्यात जमा होणार असले तरी, पालकांना मात्र हजार रुपयांचे खाते काढावे लागणार आहे. त्यामुळे पालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील बँकांतून विविध योजनेतील लाभार्थींना रक्कम वाटपाचे काम सुरू आहे. शेतकरीही पीक कर्जासाठी बँकांत चकरा मारीत आहेत. त्यामुळे बँकांत गर्दी पाहावयास मिळत आहे. शिक्षण विभागानेही विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत. जमा झालेल्या बँक खात्याचा तपशील जिल्हास्तरावर ९ जुलैपर्यंत द्यायचा आहे. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात उन्हाळ्यातील ३५ दिवसांच्या शालेय पोषण आहाराच्या किमतीएवढी रक्कम जमा होणार आहे. ही रक्कम दीडशे ते सव्वादोनशेपर्यंत जाते. २०१९-२० नुसार जिल्ह्यात १ लाख ६० हजार १६३ एवढे लाभार्थी विद्यार्थी आहेत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे यापूर्वी खाते उघडण्यात आले असले तरी, पहिली, दुसरीतील विद्यार्थ्यांचे खाते नव्याने उघडावे लागणार आहे. त्यात दीडशे ते सव्वादोनशे रुपयांसाठी पालकांना बँक खाते उघडण्यासाठी खात्यावर हजार रुपये जमा करावे लागणार आहेत. त्यात खाते काढण्यासाठी विद्यार्थ्यांनाही बँकेत न्यावे लागणार आहे. त्यामुळे पालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

बँक खाते उघडण्यासाठी लागणार हजार रुपये

शालेय पोषण आहाराच्या किमतीएवढी रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे. पहिली ते पाचवीसाठी ३५ दिवसांचे केवळ १५६ रुपये, तर सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या खात्यावर २३४ रुपये जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. एवढी रक्कम घेण्यासाठी हजार रुपयांचे बँक खाते काढावे लागणार आहे. झीरो बॅलन्सवर खाते काढण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, बँका झीरो बॅलन्स खाते उघडण्यासाठी फारशा उत्सुक नसतात.

पालकांची वाढली डोकेदुखी

शालेय पोषण आहारासाठीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचा निर्णय चांगला आहे. मात्र खाते उघडण्यासाठी खात्यात हजार रुपये जमा करावे लागणार आहेत. कोरोनामुळे अडचणीत असलेल्या पालकांनी ही रक्कम कोठून आणायची ?

- प्रकाश काशिदे, वसमत

कोरोनामुळे अगोदरच अनेक पालकांच्या हातचा रोजगार हिरावला आहे. त्यात दीडशे रुपयांसाठी हजार रुपयांचे बँक खाते उघडावे लागणार आहे. त्यापेक्षा पालकांच्या खात्यातच ही रक्कम जमा केल्यास खर्चही वाचेल.

- संभाजी पुलाते, सापळी

पालकांच्या खात्यात रक्कम जमा करावी

सध्या कोरोनामुळे बँक खाते उघडण्यासाठी विविध अडचणी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही रक्कम पालकांच्या खात्यात जमा केल्यास योग्य होईल, असे मतही काही शिक्षकांतून व्यक्त होत आहे. बहुतांश पालकांचे खाते काढलेले असते.

कोणत्या तालुक्यात किती विद्यार्थी (२०१९-२० नुसार)

हिंगोली - ३३३७५

वसमत - ४३२६४

कळमनुरी - २९७२७

औंढा ना. २३१२८

सेनगाव - ३०६६९

पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना मिळणार - १५६

सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना मिळणार - २३४