शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोनोग्राफीचा दुरुपयोग रोखण्यासाठी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 01:00 IST

राज्यात मुलींचे घटते प्रमाण लक्षात घेता, सोनोग्राफी यंत्राचा होत असलेला दुरूपयोगावर प्रतिबंध लावण्यासाठी तसेच पीसीपीएनडीटी कायद्याची प्रखरपणे अंमलबजावणी होऊन जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण समान ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी १७ मार्च रोजी कार्यशाळा घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यात मुलींचे घटते प्रमाण लक्षात घेता, सोनोग्राफी यंत्राचा होत असलेला दुरूपयोगावर प्रतिबंध लावण्यासाठी तसेच पीसीपीएनडीटी कायद्याची प्रखरपणे अंमलबजावणी होऊन जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण समान ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी १७ मार्च रोजी कार्यशाळा घेतली.प्रथम दिपप्रज्वलनाने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आकाश कुलकर्णी यांनी पीसीपीएनडीटी कायद्या संदर्भात मार्गदर्शन केले. ते म्हणाले हिंगोली जिल्ह्याचे २०११ मध्ये १०००:८६८ असे लिंग गुणोत्तराचे प्रमाण घेऊन हे, वाढीविण्यासाठी सदर कायद्याची प्रखरपणे अंमलबजावणी बाबत समुचित प्राधिकारी व सोनोग्राफी केंद्रधारकांना माहिती दिली. तर डॉ. गोपाल कदम यांनी सामाजिक स्तरावर मुलींना देण्यात येणारी वागणूक, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोण, स्त्रीयांना देण्यात येणारा दुय्यम दर्जा तसेच मुलगी जन्मल्यापासून तिच्या आरोग्याची काळजी, शिक्षण याबाबत मार्गदर्शन केले. तसेच समाजातील हुंड्याची प्रथा बंद करण्या संदर्भात त्यांनी माहिती दिली. डॉ. दिलीप भाले यांनी सर्व सोनोग्राफीधारकांना पीसीपीएनडीटी कायद्याच्या कक्षेत राहून नियमांचे पालन करणे तसेच नवीन सोनोग्राफी केंद्र नोंदणी किंवा नुतनीकरणाची पद्धत, सोनोग्राफी केंद्रावरील आवश्यक बाबी, व यंत्राची माहिती, गर्भवती स्त्रीयांची सोनोग्राफी तपासणीदरम्यान करायची कार्यवाही, मासिक अहवाल याबाबत सविस्तर प्रझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले. डॉ. सुदाम मेहत्रे यांनी समुचित प्राधिकाऱ्यांचे अधिकार, सोनोग्राफी केंद्र तपासणी करावयाची पद्धत, तपासणीदरम्यान त्रुटी आढळुन आल्यास पुढील कार्यवाही याबाबत माहिती सांगितली.यशस्वीतेसाठी अ‍ॅड. सुकेशिनी ढवळे, सुरेश शेवाळे, उद्धव कदम, प्रशांत गिरी, अनुराधा पथरोड, कल्पना लहाडे, राम गाजरे, दिपक लोखंडे आदींनी परिश्रम घेतले.कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले लिंग गुणोत्तर लक्षात घेऊन सर्व समुचित प्राधिकारी यांनी पीसीपीएनडीटी कायद्यान्वये कारवाईच्या सूचना दिल्या. तसेच सर्व सोनोग्राफी केंद्रधारकांना सदर कायद्याचे योग्य रितीने पालन करण्याचे सांगितले. जिल्ह्यातील मुलींच्या लिंग गुणोत्तर प्रमाणात वाढ कशी करता येईल याबाबत मागदर्शन करत, कारवाईच्या सूचना दिल्या.