शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणची कामे कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:41 IST

जिल्ह्यात नागरी वस्त्यांमध्ये सुरळीत व दर्जेदार विजसेवेसाठी ५२ कोटी रुपयांची कामे एकात्मिक वीज विकास व दीनदयाल उपाध्याय नागरी ग्रामज्योती योजनेत सुरू आहेत. मात्र दहा महिन्यांनंतरही यातील कामे २५ टक्केही पूर्ण झाली नसल्याने पंचाईत झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात नागरी वस्त्यांमध्ये सुरळीत व दर्जेदार विजसेवेसाठी ५२ कोटी रुपयांची कामे एकात्मिक वीज विकास व दीनदयाल उपाध्याय नागरी ग्रामज्योती योजनेत सुरू आहेत. मात्र दहा महिन्यांनंतरही यातील कामे २५ टक्केही पूर्ण झाली नसल्याने पंचाईत झाली आहे.हिंगोली जिल्ह्यात महावितरणमार्फत दरवर्षी कोट्यवधींची कामे केली जात आहेत. मात्र या सर्व कामांवर नांदेड येथील इन्फ्राच्या अधीक्षक अभियंत्यांकडून नियंत्रण ठेवण्यात येते. स्थानिक ठिकाणी त्यांचे अतिशय तोकडे मनुष्यबळ आहे. या मनुष्यबळाला प्रस्ताव तयार करणे व त्याच्या अंमलबजावणीतील कागदी घोडे नाचविणे यापलिकडे सवडही मिळत नाही. तर नांदेड येथील यंत्रणा कधीतरीच या कामांच्या तपासणीला येते. त्यामुळे कंत्राटदारांच्याच भरवशावर ही कामे होतात. यापूर्वी इन्फ्राच्या कामांमध्ये अनेक गावांतील रोहित्रच गायब असल्याचे समोर आले होते. शिवाय अनेक गावांतील वीजवाहिन्याच अजूनही ओढलेल्या नाहीत. एका गावाचे नाव सांगून दुस-याच गावात कामे केल्याचेही प्रकार घडले. यात सबकंत्राटदारांनीही मोठी करामत दाखविली होती. मात्र महावितरणने तरीही कोणताच बोध घेतला नाही. आता श्रावण इलेक्ट्रिक या कंत्राटदारामार्फत ही कामे केली जात आहेत. मात्र या कामांना गतीच नाही. खुद्द जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी या कामांसाठी अनेकदा सूचना दिल्या आहेत. ६ जानेवारी २0१७ रोजी यासाठी निविदा निघाल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात कार्यारंभ आदेश देण्यात आले. मात्र आता दहा महिन्यांनंतर शहरात काही ठिकाणी डीपीचे फ्युजबॉक्स, किरकोळ दुरुस्तीचीच कामे झाल्याचे दिसत आहे. ही कामेही सर्वच भागात पूर्ण झाली नाहीत. अनेक ठिकाणी खांब सरळ करणे, बदलणे, तारा बदलणे या कामांची सुरुवातही झाली नाही. ही योजना कार्यान्वित झाल्यास शहरात भूमिगत वीजवाहिन्याचे काम होणार आहे. मात्र या योजनेचाच पत्ता नाही.