शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवलगव्हाण साठवण तलावाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST

हिंगोली : तालुक्यातील नवलगव्हाण परिसरातील साठवण तलावाचे काम तीन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे तलावात मुबलक पाणीसाठा होत नसल्याने परिसरातील ...

हिंगोली : तालुक्यातील नवलगव्हाण परिसरातील साठवण तलावाचे काम तीन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे तलावात मुबलक पाणीसाठा होत नसल्याने परिसरातील पाणीपातळी खालावली आहे. तसेच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण परिसरामध्ये २०१७ मध्ये जलसंपदा विभागाच्या वतीने साठवण तलावाचे काम हाती घेण्यात आले. तलावात नवलगव्हाण, भांडेगाव, साटंबा आदी गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, परिसरातील विहिरी, विंधन विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होईल, या अपेक्षेने परिसरातील शेतकरी आनंदित झाले होते. परंतु, तलावाचे काम हाती घेऊनही अद्याप तलावाचे काम पूर्ण झाले नाही. तलावाच्या पिंचींगचे काम, साईड रस्ता, कालवा आदी कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे यावर्षी पाऊस जास्त होऊनसुद्धा तलावात मुबलक पाणीसाठा झाला नाही. त्यात जानेवारीपासूनच तलाव कोरडा पडण्यास सुरुवात होते. आता तलावात पाण्याचे डबके साचल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात अभियंता वाबळे यांच्याशी संपर्क साधला असता, तलावाचे काम करणाऱ्या गुतेदाराला तलावाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात महिन्यापूर्वी पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, लाखो रुपये खर्चूनही शेतकऱ्यांना अद्याप म्हणावा तसा तलावाचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचे दिसून येत आहे.

४९० हेक्टर सिंचन क्षमता...

नवलगव्हाण येथे उभारण्यात येणाऱ्या सिंचन तलावाची माथा पातळी ४७४.२०० मीटर असून महत्तम पातळी ४७२.७०० मीटर आहे. तसेच पाणी संचय पातळी ४७१.५०० मीटर असलेल्या या तलावातील पाणीसाठवण क्षमता २.७३२ दलघमी आहे. या तलावात पाणीसाठा झाल्यास परिसरातील ४९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणीच उपलब्ध झाले नाही.