शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:31 IST

हिंगोली : शहराजवळील खटकाळी भागातील एका विहिरीमध्ये १५ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह ...

हिंगोली : शहराजवळील खटकाळी भागातील एका विहिरीमध्ये १५ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. या मृत महिलेच्या हातावर कापल्याच्या जखमा असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून, तपासानंतरच ही आत्महत्या आहे की खून हे स्पष्ट होणार आहे.

खटकाळी भागातील विहिरीवर सोमवारी सकाळी चिखलवाडी भागातील काही नागरिक पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. या घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके, जमादार रविकांत हरकाळ, अशोक धामणे, गजानन पोकळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह विहिरीबाहेर काढला. दरम्यान, मृत महिला ही महसूल कॉलनी भागात राहणारी असून, तिचे नाव ऐश्‍वर्या महेश श्रीरामे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्या विहिरीत मृतदेह आढळला, त्या विहिरीवर रक्ताचे डाग असून, विहिरीपासून काही अंतरावरही रक्त सांडलेले आहे. त्यामुळे या महिलेने आत्महत्या केली की तिचा खून झाला, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.