शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या टप्प्यात नक्की कॅबीनेट मंत्री होणार; आमदार संतोष बांगर यांचे सूतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 20:30 IST

'मी व राजू नवघरे जनतेचे आवडते आमदार आहोत. त्यामुळे जनतेच्या आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत.'

औंढा नागनाथ: मी किंवा राजू नवघरे पुढील टप्प्यात कॅबीनेट मंत्री होणार असून विकास कामात कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास शिवसेना(शिंदे गट) आ. संतोष बांगर यांनी व्यक्त केला. ते औंढा तालुक्यातील येळी फाटा येथे नागरिकांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. 

नागरिकांच्या वतीने आ. राजू पाटील नवघरे व आ. संतोष बांगर यांचा आज(30 जानेवारी) रोजी नागरी सत्कार करण्यात आला. आमदार बांगर म्हणाले की, मी व राजू नवघरे जनतेचे आवडते आमदार आहोत. त्यामुळे जनतेच्या आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. पुढील टप्प्यात आम्हा दोघांपैकी एकाला नक्की कॅबीनेट मंत्रीपद मिळणार आहे, हा विश्वास मी आज सत्कार समारंभनिमित्ताने देतो. आज जरी आम्ही मंत्री नसलो तरी दोन वर्षात दोन्ही मतदारसंघात सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी पूर्ण ताकदीने शासनाकडे पाठपुरावा करून संपूर्ण जिरायत शेतींना सिंचन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आ. बांगर यांनी दिले. 

तत्पूर्वी आमदार राजू पाटील नवघरे यांनी उपस्थितांना संबोधित करून उखळी व माथा सर्कल अंतर्गत मागणी केलेले सर्व कामे टप्याटप्याने पूर्ण केली जातील त्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन उपस्थितांना दिले. यावेळी विठ्ठलराव मगर, श्री १०८ मंहत आत्मानंद गिरी, संजय दराडे, राजेंद्र सांगळे, राजाभाऊ मुसळे, कृउबा सभापती शिवाजी भालेराव, अंकुश आहेर, किरण घोंगडे, बाबासाहेब गायकवाड, पांडुरंग नागरे, प्रवीण टोम्पे, गजानन सांगळे, गोपाळ मगर,  बबनराव राखोडे, प्रा. दामोदर सांगळे, आदित्य आहेर, दतराव दराडे,  आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. दामोदर सांगळे, सूत्रसंचालन संजय दराडे तर राजेंद्र सांगळे यांनी आभार मानले.

टॅग्स :santosh bangarसंतोष बांगरShiv SenaशिवसेनाHingoliहिंगोली