शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींच्या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:20 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे १५ जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात आगमन झाले. जागो-जागी पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी जमली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे १५ जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात आगमन झाले. जागो-जागी पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी जमली होती.श्री छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे हिंगोलीत आगमन होणार असल्याने मिरवणुकीची आधीपासूनच जय्यत तयारी सुरु होती. हिंगोली शहरात रात्री ८ वाजेच्या सुमारास छत्रपतींचा पुतळा दाखल झाला. यावेळी मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात व ढोलताशांच्या गजरात मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली.हिंगोली शहरातील अग्रेसन चौक, इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक, जवाहर रोड, पोस्ट आॅफीस, विश्रामगृह, नियोजित पुतळ्याचे ठिकाण या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये विविध धर्माचे समाजबांधव सहभागी झाले होते.जिल्ह्यात पुतळ्याचे आगमन होताच डोंगरकडा, वारंगाफाटा, आखाडाबाळापूर, पार्डी मोड यासह विविध मार्गावरून पुतळ्याचे आगमन होताच शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. हिंगोलीत छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न होते. अखेर यावर्षी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला जात आहे. कोल्हापूर येथील प्रसिद्ध कारागीर संताजी चौगुले यांनी हा पुतळा तयार केला आहे. आकर्षक असा शिवरायांचा हा पुतळा ब्रॉंझचा आहे. कोल्हापूर येथून हा पुतळा हिंगोलीकडे आणण्यात आला.

टॅग्स :HingoliहिंगोलीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज