शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

समृद्ध गाव स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण करणाऱ्या गावांचा होणार सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST

लॉकडाऊनमध्येही स्पर्धेत सहभागी असलेल्या गावांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. अनेक गावांनी प्रशिक्षणाचे तीन टप्पे पूर्ण केले आहेत. समृद्ध गाव ...

लॉकडाऊनमध्येही स्पर्धेत सहभागी असलेल्या गावांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. अनेक गावांनी प्रशिक्षणाचे तीन टप्पे पूर्ण केले आहेत. समृद्ध गाव स्पर्धेच्या मूल्यांकन पद्धतीप्रमाणे ठराविक काम करणाऱ्या गावांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार जिल्ह्याच्या पातळीवर करण्यात येणार आहे. या सत्काराला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अभिनेता आमिर खान व किरण राव उपस्थित राहणार आहेत.

हा सत्कार मार्च महिन्यांमध्ये जिल्हास्तरावर होणार आहे. सत्काराला पात्र होण्यासाठी समृद्ध गाव योजनेत सहभागी होणाऱ्या गावांना २५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत जल बचतीच्या साधनांचा वापर, जलस्त्रोत विहीर बोरवेल सर्वेक्षण, विहिरीच्या पातळीचे मोजमाप, पीक लागवड अहवाल, स्वच्छ पेयजल, स्वयंसहाय्यता बचतगटाचे सभासदत्व अस्तित्वात असलेल्या रचनांचे सर्वेक्षण, पर्जन्यमापक बसविणे, पावसाच्या नोंदी ठेवण्यासाठी रजिस्टर तयार करणे, वृक्ष व जंगलाची वाढ संरक्षित करून क्षेत्र निश्चित करणे यासाठी १२० गुण राहणार आहेत. १२० गुणांपैकी ७० च्या वर गुण मिळविणारी गावे सत्काराला पात्र ठरणार आहेत पाणी फाउंडेशन ॲपवर भरलेल्या माहितीच्या आधारे हे गुण मोजले जाणार आहेत. तालुक्यातील जरोडा, वारंगा मसई, बोल्डावाडी, नवखा, शिवनी खुर्द, सालेगाव, रामवाडी, कवडा, सिंदगी,चींचोर्डी मसोड, भुरक्याचिवाडी, नांदापूर या १३ गावांनी समृद्ध गाव स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे.

सध्या ही गावे विहीर व बोरवेल गणना, हंगामनिहाय पीक माहिती आदी कामे करीत असल्याचे पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक भागवत कोटकर यांनी सांगितले.