शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्तीच्या यादीत पुन्हा गावे चुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 01:15 IST

दलित वस्ती सुधार योजनेच्या यादीला मान्यता दिल्यानंतरही प्रशासकीय मान्यतेत घोडे अडले होते. आता प्रशासकीय मान्यता झाली तर या यादीत अनेकांच्या निधीत पाच ते पंधरा हजारांची कपात केल्याचे समोर आले असून काहींना मात्र अनपेक्षित धनलाभ झाल्याने आज या प्रकाराची एकच चर्चा होताना दिसत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दलित वस्ती सुधार योजनेच्या यादीला मान्यता दिल्यानंतरही प्रशासकीय मान्यतेत घोडे अडले होते. आता प्रशासकीय मान्यता झाली तर या यादीत अनेकांच्या निधीत पाच ते पंधरा हजारांची कपात केल्याचे समोर आले असून काहींना मात्र अनपेक्षित धनलाभ झाल्याने आज या प्रकाराची एकच चर्चा होताना दिसत होती.जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीने २0 कोटी रुपयांच्या दलित वस्ती सुधार योजनेतील निधीचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात प्रशासकीय मान्यता २0.४१ लाखांची आहे. या योजनेत शिफारसी देणाऱ्या सदस्यांनी आता याद्या तपासल्या तर अनेक गावांची रक्कम पाच ते पंधरा हजार रुपयांपर्यंत कमी केल्याचे समोर आले आहे. यावरून सदस्य बोंब ठोकत असले तरीही काहींनी मात्र अनपेक्षित धनलाभ झाल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर ज्या कामाची शिफारस दिले ते कामच बदलून टाकण्याचा प्रतापही घडला आहे. सिमेंट रस्ता, पेव्हर ब्लॉक, सामाजिक सभागृहासाठी दिलेला निधी अचानक विद्युतीकरणाकडे वळता होण्यामागे काय गौडबंगाल आहे, असा सवाल काही सदस्यांनी केला. त्यामुळे हा नवाच प्रकार यावेळी समोर आला आहे. यामुळे आता पुढील काही काळ यादीतील दुरुस्तीसाठी जाणार आहे. अनेक सदस्यांनी या प्रकाराबाबत आजच पत्र लिहिण्याची प्रक्रियाही सुरू केली होती. मात्र या सगळ्या प्रकारात एक-दोन सदस्यांनी चक्क वाढीव निधी मिळाल्याचे आनंदाने सांगितल्यामुळे हा प्रकारही काही कळायला मार्ग नाही. इतरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा तर हा प्रकार नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.मागील काही दिवसांपासून चर्चेचे गुºहाळ बनलेला दलित वस्ती सुधार योजनेचा प्रश्न आता प्रशासकीय मान्यतेनंतर थंड बस्त्यात जाण्याची अपेक्षा होती. मात्र तरीही वेगळी चर्चा सुरू झाली आहे. कपातीचा निधी नेमका गेला कुठे, असा प्रश्न सदस्य उपस्थित करीत आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद