हिंगोली : येथील महिला व बालविकास कार्यालयांतर्गत असलेल्या जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत सेनगाव व वसमत येथे ग्राम बाल संरक्षण समिती प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २५ मार्च रोजी सेनगाव तर २६ मार्च रोजी वसमत येथील पंचायत समिती सभागृहात ही कार्यशाळा घेण्यात आली. सेनगाव येथील कार्यशाळेला गटविकास अधिकारी एस. आ. बेले, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील पठाण, विस्तार अधिकारी कोकाटे उपस्थित होते. तर वसमत येथील कार्यशाळेला गटविकास अधिकारी तान्हाजी गंगाराम भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी एस. के. सोरेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी बाबूलाल शिंदे उपस्थित होते.
या प्रशिक्षणाला अंगणवाडी सेविका, पोलीसपाटील उपस्थित होते. या प्रशिक्षणादरम्यान जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक गणेश मोरे, जरीब पठाण, ॲड. अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा पठाण व समुपदेशक सचिन पठाडे, रामप्रसाद मुडे, राहुल सिरसाट, अनिरुद्ध घनसावंत आदींनी मार्गदर्शन केले.