शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा तालुक्यात अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी२६ गावांत दक्षता समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:28 IST

अवैध वाळू वाहतुकीला चाप बसविण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार तालुक्यातील २६ वाळू घाटांसाठी २६ गावांमध्ये ग्राम दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे़ त्यामुळे येथील वाळू उपस्यावर या समितीचे लक्ष राहणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : अवैध वाळू वाहतुकीला चाप बसविण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार तालुक्यातील २६ वाळू घाटांसाठी २६ गावांमध्ये ग्राम दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे़ त्यामुळे येथील वाळू उपस्यावर या समितीचे लक्ष राहणार आहे़पूर्णा तालुक्यातून वाहणाºया गोदावरी व पूर्णा नदी पात्रात २६ ठिकाणी वाळू घाट आहेत़ यामध्ये गोदावरी नदीवर १९ तर पूर्णा नदीवर ७ घाटांचा समावेश आहे़ धनगर टाकळी, पिंपळगाव लिखा, कळगाव, बाणेगाव, महागाव, कान्हडखेड, कंठेश्वर, मिठापूर, सातेगाव, धानोरा मोत्या, पेनूर, धानोरा काळे, गोळेगाव, मुंबर, पिंपळगाव बाळापूर, कौडगाव, वझूर, खरबडा, देवठाण, देऊळगाव दुधाटे, उक्कडगाव, कान्हेगाव, सदलापूर या वाळू घाटातून रात्र-दिवस वाळू उपसा केला जात आहे़ यामधून शासनाचे लाखो रुपयांचे नुकसानही होत आहे़ महसूल व पोलीस प्रशासन वाळू उपस्यावर निर्बंध घालण्यासाठी समितीची स्थापना करून कारवाईही करीत आहे़ परंतु, रात्रीच्या वेळी वाळू उपसा होत असल्याने माफिया चांगलेच गब्बर झाले आहेत़ विविध उपाययोजना करूनही वाळू उपस्यावर रोख लावण्यात प्रशासन कुचकामी ठरत आहे़ त्यामुळे शासनाने वाळू घाटाच्या ठिकाणी ग्राम दक्षता समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे़ ग्रामसेवक व सरपंच यांना याबाबतचे अधिकारही बहाल केले आहेत़ तसेच वाळू धक्क्यातून वाहतूक करणाºया वाहनांची तपासणीही या समितीला करता येणार आहे़ या संदर्भात ग्राम दक्षता समितीची स्थापना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ पूर्णा तालुक्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, तालुक्यातील २६ वाळू घाटांच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्राम दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे़त्या त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची अध्यक्षपदी निवड केली आहे़ या समितीमध्ये ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी आदींचा समावेश असल्याचे महसूल विभागातून सांगण्यात आले़