शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वकिलास अंतरिम जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:34 IST

वकील असताना झालेली सोयरीक न्यायाधीशपदाची परीक्षा पास होताच मोडण्याचा प्रकार करणाºया वकिलाविरोधात वसमत येथे गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वकील असताना झालेली सोयरीक न्यायाधीशपदाची परीक्षा पास होताच मोडण्याचा प्रकार करणाºया वकिलाविरोधात वसमत येथे गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरणात अंतरिम जामिनासाठी वसमत न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने दोन्ही वकील बंधूंना २० तारखेपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे.वसमत येथील अ‍ॅड. शेख फयाजोद्दीन व अ‍ॅड. शेख अयाजोद्दीन विरोधात हुंडा मागणीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. अ‍ॅड. शेख फयाजोद्दीनची सोयरीक झालेली असताना व साखरपुडाही झालेला आहे.सदर वकील न्यायाधीशपदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने वधूपक्षाकडे १५ लाख हुंडा, २० तोळे सोने व इनोव्हा गाडीची मागणी करत सोयरीकच तोडून टाकली. या प्रकरणी वधूपित्याने पोलिसात तक्रार दिल्याने दोन्ही वकील बंधूविरोधात गुन्हा दाखल झाला होता.सदर प्रकरणात अटकपूर्व जमानतीसाठी वसमत न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर अंतरिम जामीन मंजूर केला. २० मार्चपर्यंत ही अंतरिम जमानत आहे. पाच अटींवर ही जमानत देण्यात आलेली आहे.दरम्यानच्या काळात प्रत्येक सोमवारी व बुधवारी वसमत शहर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचीही अट अंतरिम जमानत मंजूर करताना न्यायालयाने लावली आहे. न्यायाधीशपदाची परीक्षा पास झाल्यानंतर प्रतिष्ठा वाढली म्हणून भरमसाठ हुंडा मागत सोयरीक तोडण्याचे प्रकरणाने प्रचंड खळबळ उडालेली आहे.