५ एप्रिल रोजी कार व ऑटो या दोन वाहनांमध्ये कट बसल्याच्या कारणावरून दाेन गटात मारहाण झाली. यात कटर, पाईप, गज, चाकूचा वापर करण्यात आला. याप्रकरणी शफिक अहमद खाँन इब्राहिम खाँन पठाण यांच्या फिर्यादीवरून शेख मजीद शेख जानी, शेख सलीम शेख उमर, शेख असद शेख अजिस, शेख खिजर शेख असद, शेख अमेर शेख मदनी, शेख जावेद शेख जानी (सर्व रा. पुसेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
तर शेख खिजर शेख असद यांच्या फिर्यादीवरून तौफिक खॉ खॉजा खॉ पठाण, राजू खॉ खाजा खॉ पठाण, रफिक खॉ इब्राहिम खॉ पठाण, शफिक खॉ इब्राहिम खॉ पठाण, रियाज खॉजा पठाण, मुक्तार सत्तार खाॅ पठाण, सुभाण खॉ करीम खॉ पठाण (सर्व रा. पुसेगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे. दोन्ही प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि अशोक कांबळे, सपोउपनि पोटे तपास करीत आहेत.