शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

२ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:34 IST

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रशिक्षणास गैरहजर राहणाºया दोन कर्मचाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी क्षेत्रिय अधिकारी किशोर लिपने यांना ११ एप्रिल रोजी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रशिक्षणास गैरहजर राहणाºया दोन कर्मचाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी क्षेत्रिय अधिकारी किशोर लिपने यांना ११ एप्रिल रोजी दिले आहेत.लोकसभा निवडणुकीचे काम सुरळीत व मुदतीत पूर्ण व्हावेत यासाठी संत नामदेव प्राथमिक आश्रमशाळा गांगलवाडीचे मुख्याध्यापक बाळासाहेब श्रीराम पवार, रतनसिंग नाईक माध्यमिक आश्रमशाळा गांगलवाडीचे सहाय्यक शिक्षक सुधीर तुळशीराम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली होती. हे दोन्ही कर्मचारी प्रशिक्षणाचे आदेश मिळूनही प्रशिक्षणाला गैरहजर होते. या दोन कर्मचाºयांना गैरहजेरीबाबत कारणे दाखवा नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या. त्यांनी खुलाशात वैद्यकीय कारण दाखविले होते. या दोन कर्मचाºयांची वैद्यकीय तपासणीसाठी नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडे पाठविण्यात आले होते. वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर करण्याचे वैद्यकीय मंडळ व या दोन कर्मचाºयास कळविले होते. वैद्यकीय तपासणीची तारीखही या कर्मचाºयांना दिली होती. ११ एप्रिल पूर्वी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. वैद्यकीय तपासणीबाबत या दोन कर्मचाºयांना ९ एप्रिल रोजी तहसीलदार औंढा नागनाथ यांच्यामार्फत कळविले होते. पत्रही घेऊन जाण्यास या कर्मचाºयांना सांगितले होते. त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांच्या शाळेच्या नोटीस बोर्डावर चिटकविण्यात आले व पंचनामा करण्यात आला. या दोन कर्मचाºयांची कृती निवडणुकीच्या कामामध्ये कुचराई व टाळाटाळ करणारी आहे. दोन्ही कर्मचारी निवडणुकीच्या कामात गंभीर नसल्याचे दिसून आले. निवडणुक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये तसेच भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यासाठी क्षेत्रिय अधिकाºयांना प्राधिकृत केले आहे. या दोन कर्मचाºयांवर गुन्हा दाखल करून अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :hingoli-pcहिंगोलीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक