शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात चिमुकल्यांना ‘दोन थेंब जीवनाचे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:56 IST

पल्स पोलिओ मोहीम : १ लाख ३३ हजार चिमुकल्यांना देणार डोस हिंगोली : जिल्ह्यातील १ हजार १७६ बूथवर ० ...

पल्स पोलिओ मोहीम : १ लाख ३३ हजार चिमुकल्यांना देणार डोस

हिंगोली : जिल्ह्यातील १ हजार १७६ बूथवर ० ते ५ वर्षे वयाेगटातील १ लाख ३३ हजार ५८२ बालकांचे ३१ जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आरोग्य कर्मचारी, अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेत पल्स पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाभरात ३१ जानेवारी रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. एकही बालक वंचित राहू नये, यासाठी वाडी, तांडे, बसस्थानक, रेल्वेस्थानक, वीटभट्टी, झोपडपट्टी, कारखाना, आदी भागांतही विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. मोहिमेची जय्यत तयारी झाली असून प्रसिद्धीपत्रक, बॅनर, पोस्टर, मार्कर पेन, अहवाल रिपोर्ट, पोलचिट, आदी साहित्य यापूर्वीच प्रत्येक लसीकरण केंद्रावर पोहोच करण्यात आले आहे. तसेच लाऊडस्पीकरच्या साहाय्याने जनजागृती केली जात आहे. शिवाय दर्शनीय भागात फलकही लावण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. प्रेमकुमार ठोंबरे, डॉ. देवेंद्र जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली आशा, वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी अमोल कुलकर्णी, शेख मुनाफ, डी. आर. पारटकर, श्यामसुंदर जामकर, प्रशांत तुपकरी, कमलेश इशी, बापू सूर्यवंशी, आदी कर्मचारी पुढाकार घेत आहेत.

० ते ५ वर्षे वयोगटातील लाभार्थी

१३३५८२

पोलिओ डोस प्राप्त

१८३८२०

एकूण बूथ

११७६

आरोग्यसेवक

८३३

पर्यवेक्षक

२४

अशी चालेल मोहीम

आरोग्य संस्था

२४

मोबाईल पथक

८०

ट्रांझिट पथक

७५

लसीकरणाची वेळ

सकाळी ८ ते ५

असे आहेत पल्स पोलिओचे लस प्राप्त

१) जिल्ह्यातील १ हजार १७६ बूथवर लसीकरण मोहीम चालणार आहे. एकाच दिवशी सर्वच बालकांना लस देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या दिवशी काही बालके वंचित राहिल्यास पुन्हा आरोग्य कर्मचाऱ्याकडून बालकांचा शोध घेत त्याचे लसीकरण केले जाणार आहे.

२) जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार ५८२ बालकांसाठी १ लाख ८३ हजार ८२० पोलिओ डोस उपलब्ध झाले आहेत. लसीकरणाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना बूथवर पोलिओ डोस उपलब्ध होतील, असे नियोजन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील १ हजार १७६ केंद्रांवर पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसह, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना प्रशिक्षण देण्यात आले असून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

- डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्याधिकारी