शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागतही महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST

हिंगोली : पेट्रोल, डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या पेट्रोलचे दर ९३.०९ तर डिझेलचे दर ८३.२५ पोहचले आहेत. ...

हिंगोली : पेट्रोल, डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या पेट्रोलचे दर ९३.०९ तर डिझेलचे दर ८३.२५ पोहचले आहेत. डिझेल वाढीमुळे ट्रॅक्टर मालकांनी मशागतीचे दरही वाढविल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

जिल्हाभरात पेट्रोल, डिझेलच्या दरात दररोजच वाढ होत आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे मध्यमवर्गीयांसह दुचाकीवर व्यवसाय करणारे मेटाकुटीला आले आहेत. जानेवारी २०१७ मध्ये पेट्रोल ५९.५६ तर डिझेल ६२.६१ रूपये प्रतिलिटर होते. जानेवारी २०२० मध्ये पेट्रोल ८९.५० तर डिझेल ७०.२१ रुपये लिटर होते. आता जानेवारी २०२१ मध्ये दररोज काही तरी पैसे वाढ होत आहे. २७ जानेवारी रोजी पेट्रोलचे दर ९४.०८ तर डिझेल ८३.२५ रुपये लिटर दर असल्याचे पाहावयास मिळत आहे. डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टर मालकांना पूर्वीच्या दरात मशागतीची कामे करणे परवडत नसल्याने, त्यांनीही आता मशागतीच्या दरात वाढ केली आहे. गतवर्षीपेक्षा जवळपास १०० ते २०० रुपयांनी मशागतीच्या दरात वाढ झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. २०२० मध्ये रोटर करण्याचे दर ८०० रुपये होते. ते आता १००० हजार रुपये झाले आहेत.

पंजी करण्याच्या दरातही २०० रुपयानी वाढ होत ८०० रुपये घेतले जात आहेत. पेरणीचे दर २०० रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. ते आता ७०० रुपये घेतले जात आहेत. नांगरणीचे दरही १२०० रुपयांवर गेले आहेत. पूर्वी नांगरणीसाठी ११०० रुपये घेतले जात होते. ट्रॅक्टर मालकांना पूर्वीच्या इंधन दरात मशागत करण्याचे परवडत नसले तरी याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे. अगोदरच उत्पादन कमी त्यात मशागतीचा खर्च वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी बैलजोडी कमी केलेल्या शेतकऱ्यांना मशागतीचा खर्च झोप उडविणारा ठरत आहे.

मशागतीचे दर (प्रति एकर)

२०२० व २०२१

नांगरणी ११००

१२००

रोटा ८००

१०००

खुरटणी ६००

७००

पेरणी ५००

७००

मळणी (तूर) २५०

३५०

मशागतीचा एकरी ५००० रुपये खर्च

१) डिझेलच्या दरात वाढ झाल्याने मशागतीचा खर्च वाढला आहे. २०२० मध्ये मशागतीचा खर्च ३००० ते ३५०० रुपये येत होता. आता किमान एक ते दीड हजार रुपयांची यात वाढ झाली आहे.

२) सध्या तूर मळणी सर्वत्र सुरू आहे. तुरीच्या उत्पादनात घट होत असली तरी मळणीच्या दरात वाढ झाली आहे. डिझेल दरवाढीअगोदर २५० रुपये पोते घेतले जात होते. आता ३५० रुपये घेतले जात आहे.

३) मशागतीची कामे यंत्राने केली जात असल्याने शेतमजू ही इतर कामाकडे वळले आहेत. वेळेवर मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टरशिवाय पर्याय उरला नाही.

२०२० मध्ये डिझेल प्रति लिटर ७० ते ७५ रुपयापर्यंत मिळत होते. डिझेलचे दर कमी असल्याने ट्रॅक्टरसाठीच्या इंधनाचा खर्च कमी येत होता. आता डिझेल ८३.२५ रुपयावर पोहचले आहे. त्यामुळे पूर्वीच्या दरात मशागत करणे परवडत नाही. नुकसान टाळण्यासाठी ट्रॅक्टर मालकांना मशागतीच्या दरात वाढ करावी लागत आहे.

- पांडुरंग करंडे (ट्रॅक्टर मालक)

ट्रॅक्टर मालकांनी मशागतीच्या दरात वाढ केली आहे. त्यांच्या नुकसानीचा प्रश्न असला तरी शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसत आहे. अगोदरच उत्पादन कमी होत आहे. त्यात मशागत खर्चही वाढल्याने शेती करावी की नाही, हा प्रश्न निर्माण होत आहे.

- ज्ञानेश्वर पातळे (शेतकरी)

दिवसेंदिवस वाढ होत असलेल्या डिझेल दरवाढीमुळे आधुनिक यंत्राचा उपयोग करावा की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. बैलजोडी घेतल्यास चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहत आहे.

- गणेश जाधव (शेतकरी)

फोटो नंबर १३