शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘मातोश्री’भेट ठरतेय चर्चेचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:52 IST

लोकसभेची जागा शिवसेनेला सुटणार हे नक्की झाल्यानंतर शिवसेनेसह इतर पक्षातीलही काहींनी मुंबईत मातोश्रीवर भेट देत उमेदवारीची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभेची जागा शिवसेनेला सुटणार हे नक्की झाल्यानंतर शिवसेनेसह इतर पक्षातीलही काहींनी मुंबईत मातोश्रीवर भेट देत उमेदवारीची मागणी केली. दररोज घडणाऱ्या या घडामोडींची तर चर्चा होतेच. मात्र शिवसेनेच्या नेत्यांची प्रत्येक भेटही वादंगाला तोंड देणारी अथवा नवी चर्चा निर्माण करणारी ठरत आहे. आज पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्याच्या वावड्या उठल्यानंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली होती.समाजमाध्यमांवर होणाऱ्या चर्चा आता प्रत्येकच पक्षाला डोकेदुखी ठरत आहेत. शिवसेनेचे डॉ.जयप्रकाश मुंदडा यांना उमेदवारी मिळाल्याने वसमतमध्ये आतषबाजी झाल्याचे फोटो व्हायरल झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला. तर दुसरीकडे डॉ.जयप्रकाश मुंदडा, आ.हेमंत पाटील, आ.नागेश पाटील, जिल्हाप्रमुख संतोष बांगर, अंकुश आहेर आदी मंडळी मात्र मुंबईत मातोश्रीवर गेली होती. त्यांनी तेथे पक्षप्रमुखांशी चर्चा केली. तेथे अजूनही कोणालाच अंतिम उमेदवारीचा शब्द मिळाला नाही. फक्त तेथे सर्वांनी एकत्र काढलेल्या छायाचित्रावरूनच अनुमान लावत उमेदवारीच्या वाºयावरील गप्पांना ऊत आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा उमेदवारी अजून निश्चित नाही. केवळ दिलेल्या उमेदवाराचे काम करण्याचे आदेशच मिळाल्याचे सांगताना शिवसेना नेत्यांना कसरत करावी लागली.या सर्व बाबींमध्ये आ.मुंदडा यांचे नाव मात्र अंतिम मानले जात आहे. काही शिवसैनिक तर जणू उमेदवारी जाहीर झाल्याप्रमाणेच सांगत आहेत. मात्र मुंदडा यांचा गट अजूनही सावध भूमिकेतच आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच कळेल, असे सांगत आहे.सेनाच लक्ष्यसमाजमाध्यमांवर शिवसेनाच वारंवार का लक्ष्य ठरत आहे, हे कळायला मार्ग नाही. यामध्ये सेनेतील अंतर्गत गटबाजी कारणीभूत आहे की, वाढलेली इच्छुकांची संख्या, हे कळायला मार्ग नाही. मात्र सेनेच्या बाबतीतच अफवांचा बाजार कायम गरम राहत असल्याने ही बाब चिंतेची बनली आहे.आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ गेले होते. त्यात हिंगोली लोकसभेच्या उमेदवारीच्या इच्छुकांबाबत चर्चा झाली. तर जो उमेदवार दिला जाईल, त्याचे काम करा असा आदेश त्यांनी दिला. अजून उमेदवारी अंतिम झाली नाही, असे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी सांगितले.अफवा पसरविल्या जाताहेत-आहेरसेनेची उमेदवारी जाहीर झाल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. अजून उमेदवारी निश्चित झाली नाही, असे औंढा तालुकाप्रमुख अंकुश आहेर यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv Senaशिवसेना