शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधकाम; ३९ कोटी रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:52 IST

जिल्ह्यात संपूर्ण स्वच्छता अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मागील सहा महिन्यांतच मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम झाले. मात्र त्यासाठीच्या प्रोत्साहन अनुदानाची बोंब अजूनही संपली नसून सर्व लाभार्थ्यांची देयके अदा करण्यास अजून ३९ कोटी रुपये लागणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात संपूर्ण स्वच्छता अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मागील सहा महिन्यांतच मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम झाले. मात्र त्यासाठीच्या प्रोत्साहन अनुदानाची बोंब अजूनही संपली नसून सर्व लाभार्थ्यांची देयके अदा करण्यास अजून ३९ कोटी रुपये लागणार आहेत.हिंगोली जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत संपूर्ण स्वच्छता अभियानात शौचालय बांधकामास मोठी गती आली होती. त्यामुळे एकाचवेळी मोठ्या संख्येने झालेल्या कामांमुळे प्रोत्साहन अनुदानाच्या बारा हजारांच्या रक्कमेचा पेच निर्माण झाला होता. झालेल्या कामांप्रमाणे देयके सादर होत असली तरीही ती अदा होण्यास निधीची अडचण होती. यात ५९.८४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. यापैकी ५५.२१ कोटी रुपये तालुका स्तरावर वितरित झालेले आहेत. तालुका स्तरावर यापैकी ११.२४ कोटी रुपयांचे वाटप सुरू आहे. तर जिल्हा स्तरावर ४.९४ कोटी रुपये शिल्लक आहेत.जानेवारी २0१८ पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यासाठी प्रशासनाने मोठी लगबग चालविली होती. त्यामुळे औंढ्यात ११९२४, वसमतला १७२३१, हिंगोलीत १२८११, कळमनुरीत १८११५, सेनगावात १७७५२ अशा एकूण ७७८३३ शौचालयांचे काम पूर्ण झाले. त्यांना प्रत्येकी १२ हजार रुपये याप्रमाणे ९३.३९ कोटी रुपये एवढा निधी लागणार होता. ५४ कोटीच मिळालेले असल्याने उर्वरित ३९ कोटींचा प्रश्न आहे. यापैकी ४ कोटी रुपये नुकतेच प्राप्त झाले असल्याचे सांगितले जाते. जिल्हा नियोजन समितीकडूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देणे शक्य नाही. तर केंद्र शासनाकडून निधी येत नाही.या योजनेत औंढा तालुक्यास ४.८८ कोटी, वसमतला ७.७६ कोटी, हिंगोलीला ५.४४ कोटी, कळमनुरीत १0.५१ कोटी तर सेनगावला १0.४७ कोटी रुपये निधी लागणार आहे. एवढी रक्कम मिळाल्यास सर्व लाभार्थ्यांना प्रोत्साहन अनुदान देणे शक्य होणार आहे. मात्र ही रक्कमच शासनाकडूनदिली जात नसल्याचे चित्र आहे. जि.प.स्तरावरून याचा पाठपुरावाही सुरू आहे. लाभार्थी मात्र यासाठी गावात सरपंच, ग्रामसेवक अथवा बांधकामास प्रवृत्त करणाऱ्यांच्या मागे तगादा लावत आहेत. ही मंडळी जि.प.त चौकशी करून हैराण आहे.संपूर्ण स्वच्छता अभियानाचा दुसरा टप्पा म्हणून घनकचरा व्यवस्थापन व बांधकाम झालेल्या शौचालयांचा वापर करण्यासाठी स्वच्छताग्रही नेमण्याचा असून लवकरच सुरू होणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान