शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेसाठी ‘केंद्र द्या केंद्र’ म्हणण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:01 IST

शालांत प्रमाणपत्र परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना तालुक्यातील कापडसिनगी येथे स्वयंम अर्थसहाय्य अनुदानावर चालणाºया दोन माध्यमिक विद्यालयाच्या कारभारामुळे ऐन वेळी दहावीची परीक्षा देणा-या ६९७ विद्यार्थ्यांची अचानक वाढ झाल्याने तालुक्यातील परीक्षा नियोजनाचे वाभाडे निघाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : शालांत प्रमाणपत्र परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना तालुक्यातील कापडसिनगी येथे स्वयंम अर्थसहाय्य अनुदानावर चालणाºया दोन माध्यमिक विद्यालयाच्या कारभारामुळे ऐन वेळी दहावीची परीक्षा देणा-या ६९७ विद्यार्थ्यांची अचानक वाढ झाल्याने तालुक्यातील परीक्षा नियोजनाचे वाभाडे निघाले आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी परीक्षा केंद्राचा शोध घेत अनेक शाळेची दारे ठोठावत फिरत आहेत.सेनगाव तालुक्यात शालांत प्रमाणपत्र परीक्षेकरिता शिक्षण विभागाने परीक्षा मंडळाकडे पाठविलेल्या माहितीनंतर विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात तालुक्यात एकूण ९ परीक्षा केंद्राचे नियोजन केले होते; परंतु स्वयंम अर्थसहाय्य मान्यतेवर चालणाºया तालुक्यातील कापड सिनगी येथील संत रेखेबाबा माध्यमिक विद्यालय व गजानन माध्यमिक विद्यालय या दोन शाळेच्या गोंधळाने शिक्षण विभाग मात्र तोंडघशी पडला असून परीक्षा दोन दिवसांवर आली असताना या शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना परीक्षेस बसवायचे कुठे? हा प्रश्न गंभीर आहे. यासाठी तालुकाभर परीक्षा केंद्राचा शोध आहे. कापडसिनगी येथे स्वयंअर्थसहाय्य मान्यता मिळालेल्या संत रेखेबाबा माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये तब्बल ३०२ विद्यार्थी तर गजानन माध्यमिक विद्यालयात ३९८ विद्यार्थी असे एकुण ६९७ विद्यार्थी या दोन विद्यालयात दहावीची परीक्षा देणार आहेत. परंतु या दोन्ही विद्यालयात दहावीची परीक्षा देणारे ६९७ रेकॉर्डब्रेक विद्यार्थी असल्याची माहितीच तालुका शिक्षण विभागासह जि.प.च्या शिक्षण विभागाला नाही. परीक्षा आठ दिवसांवर आल्यानंतर या दोन विद्यालयात दहावीचे ६९७ परीक्षार्थी असल्याचे परीक्षा बोर्डाने माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना पाठविलेल्या पत्रानंतर समोर आले. तब्बल ६९७ विद्यार्थी वाढल्याने सेनगाव पं.स. समितीचे गटशिक्षणाधिकारी सीताराम जगताप यांनी या दोन्ही शाळेला भेट देवून वाढीव परीक्षा केंद्राचे नियोजन सुरू केले. परंतु या दोन्ही विद्यालयाला कोणत्याही प्रकारची इमारत नाही, ना सुविधाही, दोन्ही ही विद्यालयात १०० विद्यार्थीही बसू शकतील की नाही, याची खात्री नसल्याने शिक्षण विभागाच्या अधिकाºयांनी या विद्यार्थ्यांसाठी सेनगाव शहरात वाढीव परीक्षा केंद्राचा शोध घेणे सुरू केले.... हॅलो पान ४ वर