शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जवळ्यात तीन बसची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:55 IST

परळी वैजनाथ येथील मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून शनिवारी सकाळी १०.३० वाजता जवळा बाजार येथे बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जमावाने एस.टी. महामंडळाच्या तीन बसची तोडफोड करून रस्त्यावर टायर जाळले. बाजारपेठही दिवसभर कडकडीत बंद ठेवली.

लोकमत न्यूज नेटवर्कजवळा बाजार : परळी वैजनाथ येथील मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून शनिवारी सकाळी १०.३० वाजता जवळा बाजार येथे बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जमावाने एस.टी. महामंडळाच्या तीन बसची तोडफोड करून रस्त्यावर टायर जाळले. बाजारपेठही दिवसभर कडकडीत बंद ठेवली.जवळाबाजार येथील बसस्टॅन्ड परिसरामध्ये शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास सकल मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने रास्ता रोको केला. यावेळी टायर जाळून रस्ता बंद केला. त्यामुळे दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या मोर्चातील काही जणांनी परभणी रस्त्यावर उभ्या असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेसवर प्रचंड दगडफेक केली. यामध्ये अंबाजोगाई-नागपूर (बस क्र. एमएच ४० वाय ५४३२) या नागपूर आगाराच्या बसचे मोठे नुकसान झाले. परभणी आगाराची बस परभणी- नागपूर (क्र. एमएच २० बी.एल. २६९६) तर हिंगोली आगाराची बस एम.एच. ०७ सी ७४५९ च्याही काचा फोडण्यात आल्या. दीड तासानंतर आंदोलन संपले. मात्र आंदोलन सुरू असताना जमाव बस फोडत असल्यामुळे पोलिसांची मोठी धांदल उडाली. त्यानंतर त्यांनी काही वाहनांना पोलीस बंदोबस्तामध्ये दूर नेले.यावेळी हट्ट्याचे सपोनि गुलाब बाचेवाड, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, जमादार शे. खुद्दूस, शे. लाल सह सर्व कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त केला होता. मात्र तोडफोडीनंतर वसमत येथील पोलीस बंदोबस्त मागविला. वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशिद दाखल झाले. त्यानंतर बस फोडणाºया कार्यकर्त्यांवर हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.सेनगावात कडकडीत बंदसेनगाव : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी परळी वैजनाथ येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी सेनगाव शहर कडकडीत बंद पाळण्यात आले. समाजाच्या वतीने येथील तहसीलदारांना निवेदन देवून मराठा आरक्षण तातडीने देण्याची मागणी करण्यात आली.सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शनिवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. सेनगाव शहर बंदच्या केलेल्या आवाहनास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील व्यापारी प्रतिष्ठाणे दिवसभर कडकडीत बंद होती. यासंबंधी येथील तहसीलदारांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.यावेळी संदेश देशमुख, भारत लोखंडे, सचिन देशमुख, जगदीश देशमुख, साहेबराव तिडके, उमेश देशमुख, शिवाजी देशमुख, डॉ. जगदीश गोरे, संजय टाले, सी.व्ही. झुंगरे, जगदीश गाढवे, प्रकाश गाढवे, गणेश जारे, दत्तराव देशमुख, संदीप बहिरे, डॉ. सुजीत देशमुख, रामेश्वर देशमुख, संतोष तिडके, दिगंबर देशमुख, अनिल गिते, लक्ष्मण गायवाल, सचिन शिंदे, बबन व्यवहारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा