शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ १२0 कलाकारांना अजून मानधन मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:29 IST

वृद्ध साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांपैकी १२0 जणांची गतवर्षी मानधनासाठी निवड झाली आहे. मात्र अद्याप त्यांच्या हाती छदामही पडला नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वृद्ध साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांपैकी १२0 जणांची गतवर्षी मानधनासाठी निवड झाली आहे. मात्र अद्याप त्यांच्या हाती छदामही पडला नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध साहित्यिक तथा कलाकारांना जीवन जगण्यासाठी मदत म्हणून त्या-त्या श्रेणीनुसार अनुदान दिले जाते. जि.प.कडून दरवर्षी ६0 कलाकारांची या योजनेत निवड केली जाती. मात्र २0१६-१७ व २0१७-१८ या दोन वर्षांसाठी एकत्रितच १२0 कलाकारांची निवड गतवर्षी करण्यात आली. समितीने या कलाकारांची निवड केली असली तरीही त्यांना मानधन मात्र सुरू झाले नाही. राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडे ही यादी वेळेत पोहोचल्याचेही सांगितले जाते. तरीही एकाही कलाकाराच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे ही कलाकार मंडळी समाजकल्याण विभागाचे खेटे घालत आहे. त्यांना मात्र मंत्रालय स्तरावरूनच मंजुरी मिळाली नसल्याचे ऐकायला मिळत आहे.यंदासाठी प्रस्ताव मागविलेयावर्षी आता पुन्हा ६0 कलाकारांची निवड मानधनासाठी करावी लागणार आहे. त्यासाठीचे प्रस्ताव मागविले आहेत. संबंधित पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करायचा आहे. ते जि.प.च्या समाजकल्याणकडे आल्यानंतर वृद्ध कलाकारांची निवड करण्यासाठी असलेल्या समितीसमोर सादर केले जाणार आहेत. आॅक्टोबरअखेरपर्यंत प्रस्ताव दाखल करता येतील,असे समाजकल्याणकडून सांगण्यात आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार