शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्हा कचेरीसमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:28 IST

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ भारिपच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर २० जानेवारी रोजी करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात जिल्हाभरातील आंबेडकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.

ठळक मुद्देभीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ भारिपच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर २० जानेवारी रोजी करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात जिल्हाभरातील आंबेडकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी संपूर्ण देशातून आलेल्या आंबेडकरी जनसमुदायावर दगडफेक करुन अनेकांना जखमी केले होते. तसेच वाहनांच्या काचा फोडून जाळपोळही केली होती. विशेष म्हणजे या हल्ल्यात एका तरुणाचा बळी गेला आहे. त्यामुळे हल्लेखोराविरुद्ध कायदेशिर गुन्हे दाखल करुन दंगल घडविणाºयावर सूत्रधारावर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी. तसेच ३ जानेवारी रोजी महाराष्टÑ बंदमध्ये सहभागी झालेल्या अंदोलनकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन त्या कार्यकर्त्यांची सुटका करावी आदी मागण्यासाठी आंबेडकरी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा काढला होता. तर जिल्हा कचेरीसमोर ठिय्या आंदोलन केले. जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनावर युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र वाढे, प्रभावती खंदारे, अशोक खंदारे, अशोक कांबळे, ज्योतीपाल रणवीर, बबन भुक्तर, शेख अतिक खुर रहेमान, अ‍ॅड. धम्मदीपक खंदारे, समाधान खंदारे, प्रकाश गव्हाणे, रुपेश कदम, सतीश पंडित, किरण पाईकराव आदींच्या स्वाक्षºया आहेत.जिल्हाधिकारी कचेरी : पोलीस बंदोबस्त१ जानेवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्यात मृत्यू झालेल्या व आर्थिक नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई देण्यासह भारिपचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्याची मागणीही निवेदनाद्वारे केली. तसेच सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील प्रकरणात बौद्ध समाजाच्या युवकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन खरे आरोपी व सूत्रधारांना अटक करण्याचीही मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तर जागो- जागी वाहतूक वळविण्यात आली होती.