शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

ना हातात बसतात, ना खिशात मावतात; असे मोबाईल चोरट्यांना सोयीचे ठरतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:34 IST

हिंगोली : प्रत्येकजण ऑनलाईन झाल्याने आकाराने मोठा डिस्प्ले असलेला मोबाईल वापरण्याची क्रेझ आली आहे. मात्र असे मोबाईल ...

हिंगोली : प्रत्येकजण ऑनलाईन झाल्याने आकाराने मोठा डिस्प्ले असलेला मोबाईल वापरण्याची क्रेझ आली आहे. मात्र असे मोबाईल एकतर हातात बसत नाहीत, दुसरे खिशातही मावत नाहीत, त्यामुळे हे मोबाईल चोरट्यांसाठी सोयीचे ठरत आहेत. असे मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या वेगाने वाढली आहे. ग्राहकांची असलेली मागणी लक्षात घेता, विविध कंपन्या मोबाईल उत्पादन क्षेत्रात उतरल्या आहेत. सर्व व्यवहार मोबाईलवर होत असल्याने विविध ॲप असलेल्या मोबाईलला पसंती देत आहेत. आता ऑनलाईन अर्ज करण्यापासून ते मोबाईलवर चित्रपट पाहणे, फेसबुक, ट्विटर, इंन्स्टाग्रामसारख्या सोशल माध्यमांचा वापरही केला जात आहे. त्यामुळे आता प्रत्येकजण मोठ्या आकाराचा डिस्प्ले असलेला मोबाईल वापरत आहेत. मात्र आता असे मोबाईलच चोरट्यांच्या सोयीचे ठरत आहेत. असे मोबाईल एकतर हातात बसत नाहीत. खिशात ठेवावे, तर खिशातही मावत नाहीत. त्यामुळे हातात मोबाईल ठेवावा लागत आहे. चोरटे हीच संधी साधून हातातून मोबाईल हिसकावून घेऊन जाण्याची शक्यता वाढत आहे. अनेकवेळा असे मोबाईल विसरले जात आहेत.

चोरी नव्हे, गहाळ म्हणा

-चोरीला गेलेल्या मोबाईलची तक्रार पोलीस ठाण्यात द्यायला गेल्यास अशी तक्रार घेण्यास जवळपास सर्वच पोलीस ठाण्यात टाळाटाळ केली जात आहे.

- तक्रार घेण्याचा आग्रह केल्यानंतरही त्यात मोबाईल गहाळ झाल्याचा उल्लेख करावा लागत असल्याचा अनेकांचा आरोप आहे.

- मोबाईल चोरीला गेल्याऐवजी गहाळ झाल्याची नोंद होत असल्याने असे मोबाईल शोधण्याकडेही कानाडोळा होत आहे.

- परिणामी मोबाईल चोरीला गेल्यानंतरही परत मिळण्याची शक्यता कमीच असते.

या भागामध्ये मोबाईल सांभाळा...

- हिंगोली शहरातील गांधी चौक बाजार भागात मोबाईल चोरीला गेल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.

- त्यानंतर रेल्वेस्टेशन, बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा उचलत चोरटे सहज मोबाईल लांबवित आहेत.

- जवाहर रोड यासह गर्दीच्या ठिकाणी मोबाईल सांभाळून ठेवणे गरजेचे बनले आहे.

हिंगोली शहरातील मोबाईल चोरीच्या घटना

चोरीला गेलेले, गहाळ झालेले मोबाईल

२०२०-०४ ७१

२०२१ -०१ ५७