शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वाळू घाटावरील अवैध उत्खनन रोखले नसल्याने सरपंचावर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:13 IST

जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांवर कारवाईचा एकीकडे धडाका सुरू आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील टाकळगव्हाण येथील घाटाची निविदा रद्द करून कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केली होती. आता या गावातील सरपंचांचे पद रद्द करण्याची शिफारस उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांवर कारवाईचा एकीकडे धडाका सुरू आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील टाकळगव्हाण येथील घाटाची निविदा रद्द करून कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केली होती. आता या गावातील सरपंचांचे पद रद्द करण्याची शिफारस उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी मागील वर्षभरात महसूलची पथके विविध भागात तैनात आहेत. या पथकांकडून अवैध वाहतुकीची वाहने पकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आला आहे. मात्र औंढा नागनाथ तालुक्यातील टाकळगव्हाण येथील घाट लिलावात गेल्यानंतर संबंधित कंत्राटदारच अवैध वाळू उत्खनन करीत असल्याचा ठपका ठेवत तो रद्द करण्याची शिफारस उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केली होती. तर कंत्राटदार संदीप नरवाडे यांच्या प्रगती कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केली होती. शिवाय जवळा बाजारच्या तलाठी उज्ज्वला मैड यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र ग्रामपंचायतीचे सरपंच हे ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांनीही अवैध रोखून ते तहसीलदार, जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून देणे हे त्यांच्यासह समितीचे कर्तव्य आहे. असे असताना टाकळगव्हाण येथे तर या समितीचीच कधी बैठक झाली नाही. त्यामुळे पुढील कार्यवाही होणेच अपेक्षित नाही. या समितीने कर्तव्यात कसूर केल्याचे समोर उपविभागीय अधिकाºयांनी समोर आणले आहे. यामुळे ग्रामपंचायत अधिनियमानुसार कर्तव्यात कसूर केल्यास अशा सरपंच, उपसरपंच व सदस्यास अधिकार पदावरून काढता येते. टाकळगव्हाण येथील सरपंचांनी या कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने ग्रा.पं. अधिनियम १९५८ मधील कलम ३९ व ४५ नुसार त्यांचे पद रद्द करण्याची कार्यवाही प्रस्तावित केली आहे. बहुदा अशा प्रकारची कारवाई मराठवाड्यात तरी पहिल्यांदाच होत असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे.टाकळगव्हाण येथील सरपंचांचे नाव बालासाहेब पावडे आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीriverनदी