शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

...तर आम्ही घेणार तलावात उड्या; तलाबकट्टावरील अतिक्रमणधारक आले रडकुंडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 19:55 IST

तलाबकट्टा परिसरातील १९५ अतिक्रमणधारकांना प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत.

ठळक मुद्देआम्हाला याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने येथे कायम ठेवा.

हिंगोली : आमची तिसरी पिढी या तलाबकट्ट्यावर राहत आहे. आता ही जागा सोडू वाटत नाही. मात्र आम्हाला दुसरीकडेही जागा नाही. आता पुनर्वसन न करताच हटविले तर तलावात उड्या घेवू, असा इशारा धुपरताबाई ओंकार देवकते, वच्छलाबाई ढोके या वृद्धांनी दिला.

तलाबकट्टा परिसरातील १९५ अतिक्रमणधारकांना प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. आता त्यांना अंतिम इशारा देवून स्वत: अतिक्रमण न हटविल्यास प्रशासन ते काढणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ज्यांची आर्थिक कुवत आहे, अशांनी इतरत्र जागा शोधण्याचे अथवा भाड्याने राहण्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मात्र हातावरच पोट असलेल्या काहींना हे जमत नसल्याने ते अजूनही शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. आज पुन्हा काही जणांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेत गाºहाणे मांडले. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या अतिक्रमणाबाबत याचिका टाकली असून त्याचा निकाल येईपर्यंत अतिक्रमण हटवू नये, अशी मागणी केली. त्यात २00२ च्या शासन निर्णयाचा दाखला देत मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये १९८५ च्या अगोदरपासून असलेली अतिक्रमणे नियमित करण्यास सांगितले आहे, असे निवेदनात म्हटले. आम्हाला याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने येथे कायम ठेवा. दीड ते दोन हजार लोकांचा हा समूह असून लहान मुले, वृद्ध, बाळंत  महिला, शिक्षण घेणाऱ्या मुलांवर याचा परिणाम होणार असल्याचे निवेदनात म्हटले. मराठा शिवसैनिक सेनेचे विनायक भिसे यांच्या नेतृत्वात कमल कुरील, मन्नू कुरील, शेख उस्मान, स.युनूस, शेख मेहबूब, राधेश्याम मुदिराज, मीना शर्मा आदींच्या सह्यांचे निवेदन दिले.

मंदिरावर जमली वयोवृद्ध मंडळीप्रशासनाला तक्रार दिल्यानंतर तलाबकट्टा भागातील मारुती मंदिरावर या भागातील नागरिकांसह वृद्ध मंडळी जमली होती. यावेळी या महिलांनी आता पुनर्वसन न करताच हलविले तर जायचे कुठे? असा प्रश्न उपस्थित केला. काहींच्या डोळ्यातून तर आश्रूंच्या धारा लागल्याचे दिसत होते. धुरपताबाई देवकते व वच्छलाबाई ढोके या दोन वृद्धांनी मात्र आमची सगळी हयात येथे गेली. आतापर्यंत कुणीच आम्हाला हटविले नाही. आता या वयात आर्थिक परिस्थिती नसतानाही नातू-पोतू घेवून जायचे कुठे? जागा न दिल्यास तलावात उड्या घेण्याचा इशाराही दिला.

टॅग्स :HingoliहिंगोलीEnchroachmentअतिक्रमणHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली