शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

...तर पथकाला शस्त्रधारी पोलीस संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:23 IST

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक पूर्णपणे बंद झाली पाहिजे, यासाठी जिल्हा पातळीवर महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक पूर्णपणे बंद झाली पाहिजे, यासाठी जिल्हा पातळीवर महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. पण महसूलच्या आशा पथकांवर जीवघेणे हल्ले झाल्याने आशा पथकाला आता सशस्त्र पोलिसांचे संरक्षण मिळणार आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्व ठाणेदारांना आदेश दिला असून मागणी होताच तात्काळ सशस्त्र पोलीस पुरविण्यास बजावले आहे.हिंगोली जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून हिंगोली जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाने कंबर कसली आहे. यासाठी पथकेही तैनात केली.या दरम्यान महसूल कर्मचाºयांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हास्तरीय पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी नेमलेल्या पथकासमवेत दोन सशस्त्र पोलिसांची नियुक्ती केली असल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना कळविले आहे. त्या पत्राच्या संदर्भान्वये जिल्हा पोलीस अधीक्षकांनी १५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेदारांनी आदेशित केले आहे.या आदेशानुसार महसूल कर्मचाºयांच्या पथकाने मागणी करताच दोन सशस्त्र पोलीस ठाणे हद्दीत पुरवावेत, असा आदेश दिला आहे. त्यामुळे आता गौण खनिज चोरीवर नियंत्रण ठेवणाºया पथकाला सशस्त्र पोलिसांचे सरक्षण मिळणार आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcollectorजिल्हाधिकारी