शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

हिंगोली जिल्ह्यात ‘थकीत वीजबिल’ धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 23:59 IST

महावितरणने थकीत वीजबिल न भरणा-या ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्याचा निर्णय घेतला असून गुरूवारपासून जिल्हाभरात मोहीम सुरू केली आहे. माहे एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत ज्यांनी बिल भरणा केला नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडीत केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देबिल न भरणा-यांची वीज तोडणार

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महावितरणने थकीत वीजबिल न भरणा-या ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्याचा निर्णय घेतला असून गुरूवारपासून जिल्हाभरात मोहीम सुरू केली आहे. माहे एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत ज्यांनी बिल भरणा केला नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडीत केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.थकीत बिल न भरणा-या ग्राहकांची थेट वीज तोडली जाणार असून शासकीय कामात अडथळा करणा-यांवर महावितरणकडून गुन्हा दाखल केला जाणार आहे. संबंधित तालुक्याच्या वीज अधिकारी व कर्मचा-यांना सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या शेतक-यांनी ३ हजार रूपये हप्ता भरणा केला नाही, त्यांचीही वीज जोडणी तोडली जाणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी महावितरणने ठरवून दिलेला हप्ता न चुकता भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आता महावितरणने आॅनलाईन कॅश कलेक्शन सिस्टीम सुरू केली आहे. त्यामुळे थेट वीजबिल आता आॅनलाईन प्रद्धतीने मुख्य कार्यालयाकडे रक्कम जमा होणार आहे. जिल्हाभरात वीज बिल वसुली मोहिमेस गुरूवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या वीज ग्राहकांचे बिल थकीत आहेत, त्यांनी तत्काळ महावितरणकडे भरणा करावी, असे आवाहन अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी, राजेश लोंढे, उपकार्यकारी अभियंता दिनकर पिसे यांनी केले आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचे थकीत बिलांच्या रक्कमेची आकडेवारी वाढल्याचे महावितरणने सांगितले. बिलासंदर्भात काही अडचण किंवा समस्या असल्यास संपर्क करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.तालुकानिहाय थकीत वीजबिलएप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत ज्यांनी बिल भरणा केला नाही, अशा तालुक्यांची विद्युत वितरण कंपनीने यादी काढली आहे. यामध्ये कमर्शियल, घरगुती औद्योगिकक्षेत्र तसेच ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या आकडेवारीचा समावेश आहे. हिंगोली तालुक्यातील ३ हजार २४ ग्राहकांकडे ३६६.९७ लाख रुपये थकबाकी आहे. तर वसमत येथील ४ ४७० ग्राहकांचे ३४६.८० लाख, औंढ्यात १२८३ ग्राहकांचे २९.९७ लाख, सेनगाव ३ हजार ६७४ ग्राहकांचे ५८९ लाख तसेच कळमनुरी २ हजार ९४६ वीज ग्राहकांची ५८०.११ लाख रूपये वसुली करणे बाकी आहे.पोलिसांची मदतवीज कर्मचा-यांना मारहाण करणाºयांवर कडक कारवाई करण्यासाठी महावितरण पोलिसांची मदत घेणार आहे. दिवसेंदिवस वसुली कामात अडथळा करणा-यांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेतला.